मुंबई : टी-20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरी आणि विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसतोय. अशातच आता सोशल मीडियावरील चाहते त्यांच्या स्टारला पाठिंबा देण्यासाठी उघडपणे समोर येतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान कोहलीने स्वतः टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवलं. यावेळी गांगुली यांनी सांगितलं होतं की, मी कोहलीला टी-20 मध्ये कर्णधारपद कायम ठेवण्यास सांगितलं होतं. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याचा विरोध केला. अशा परिस्थितीत दोघांमधील तणाव वाढला आहे.



ट्विटरवर कोहली आणि दादाच्या चाहत्यांमध्ये खडाजंगी


या वादानंतर, World Stand with Kohli (#WorldStandsWithKohli) आणि Nation Stand with Dada (#NationStandsWithDada) हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागले. 



यावेळी एका यूजरने लिहिलं की, भारत किंग कोहलीचा अपमान सहन करणार नाही. तर दुसऱ्या यूजरने कोहलीसाठी लिहिले की, काही लोक तुझा तिरस्कार करत असतील, पण लाखो चाहते आहेत, जे तुझ्यावर खूप प्रेम करतात. 



यानंतर दादांचे चाहतेही मागे राहिले नाहीत. एका यूजरने लिहिले की, ही तीच व्यक्ती आहे ज्याने भारतीय क्रिकेट बदललं. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, झहीर खान, हरभजन सिंग सारखे खेळाडू घडवलं आहेत.