Kendra Lust Want To Meet Indian Cricketer: पाटणा रेल्वे स्थानकावरील (Patna Junction Railway Station) जाहिरातींच्या स्क्रीनवर रविवारी अचानक अश्लील व्हिडीओ प्ले झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये दोन कर्मचाऱ्यांना नोकरी वरुन काढण्याबरोबरच पोलिसांनीही त्यांच्यावर कारवाई केली आहे. एकीकडे हे सुरु असतानाच दुसरीकडे जो व्हिडीओ लावण्यात आलेला त्या व्हिडीओमधील पॉर्नस्टार कोण होती याबद्दलची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही केंद्रा लस्ट (Kendra Lust) असून तिनेच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. बरं याच्या पुढे जात या पॉर्नस्टारने थेट एका भारतीय क्रिकेटपटूला (Indian Cricketer) भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


ती मीच असेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रा लस्टने (Kendra Lust) 21 मार्च रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये #BiharRailwayStation असं म्हणत स्वत:चा एक फोटो ट्वीट केला होता. या ट्वीटमधील फोटोमध्ये केंद्रा भारतीय पोषाखामध्ये दिसत आहे. काही चाहत्यांनी तिला भारतीय रेल्वे स्थानकावर लागलेल्या व्हिडीओमधील पॉर्नस्टार तूच आहेस का असा प्रश्न विचारला. त्यावर रिप्लाय देताना केंद्राने, मला अपेक्षा आहे की ती मीच असेन, असं म्हटलं. तिचं हे ट्वीट तुफान व्हायरल झालं. 


शमीबद्दल काय म्हणाली केंद्रा?


केंद्राने पोस्ट केलेल्या याच फोटोवर एका चाहत्याने तिला, "तू मोहम्मद शामीला कधी भेटणार आहेस?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही केंद्राने रिप्लाय केला आहे. मोहम्मद शामी (Mohammed Shami) हा भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आहे. "मला अपेक्षा आहे की मी त्याला लवकरच भेटेल. मी त्याची चाहती आहे," असं केंद्राने या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.



केंद्राचं हे ट्वीट पाहून भारतीय क्रिकेट चाहते आता शमीला ट्रोल करताना दिसत आहेत.




पाटणा रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं?


19 मार्च रोजी पाटणा रेल्वे स्टेशनवर जाहीरातींसाठी लावण्यात आलेल्या मोठ्या डिजीटल स्क्रिनवर अचानक अश्लील फिल्म सुरु झाली. तब्बल तीन मिनिटं स्क्रिनवर ही अश्लील फिल्म सुरु होती. यानंतर तिथल्या प्रवाशांनी जीआरपी आणि आरपीएला याबाबतची माहिती दिली. स्क्रिनवर जाहीराती चालवणाऱ्या एजन्सीला संपर्क साधण्यात आला आणि हे प्रसारण थांबवण्यात आलं. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जाहीरातीची एजन्सी असणाऱ्या दत्ता कम्युनिकेशनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या जाहिराती चालवल्या जातात त्या केंद्रावरील काही कर्मचारी ही अश्लील चित्रफित पाहत असताना चुकून त्यांनी ती मोठ्या स्क्रिनवर सुरु केली आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु असला तरी हे प्रकरण अगदी सातासमुद्रापारपर्यंत गेल्याचं केंद्राने केलेल्या ट्वीटवरुन स्पष्ट होत आहे.