Rohit Sharma: वर्ल्डकप हरल्यानंतर चाहते नाराज...; फायनलच्या आठवणीने पुन्हा भावूक झाला रोहित
Rohit Sharma: कपिल शो`च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोवेळी रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवाची आठवण काढत भावूक झाला होता.
Rohit Sharma: टीम इंडियाचा स्टार कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्ये खेळतोय. यंदा मुंबईची टीम रोहित नव्हे तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळतेय. याच कारणाने सध्या रोहित शर्माचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रोहित गेल्या 17 वर्षांपासून टीम इंडियामध्ये खेळतोय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली मात्र केवळ एका म्हणजेच फायनल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
नुकतंच कपिल शर्माचा नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतोय. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोवेळी रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवाची आठवण काढत भावूक झाला होता.
कपिल शर्माच्या शोमध्ये 2023 च्या वर्ल्डकप फायनलची आठवण काढत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'सामन्याच्या दोन दिवस आधी आमची टीम अहमदाबादमध्ये होती. त्यावेळी आम्ही चांगला सरावही केला होता. इतकंच नाही तर आमची टीम उत्कृष्ट कामगिरी करत होती.
रोहित शर्मा पुढे म्हणतो, '2023 च्या वर्ल्डकप फायनलच्या वेळी आमची टीम ऑटोपायलटवर खेळत असल्याचा भास होत होता. फायनलच्या दिवशी सामना सुरू झाला तेव्हा आम्हीही चांगली सुरुवात केली होती. त्या सामन्यात शुभमन गिल लवकर बाद झाला पण नंतर विराट कोहली आणि मी काहीशी चांगली पार्टनरशिप केली. आम्हाला खात्री होती की आम्ही चांगला स्कोर उभा करू शकू.
पराभवाच्या कटू आठवणी उजळताना रोहितच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं की, मोठ्या सामन्यांमध्ये सुरुवातीला रन्स करून विरोधी टीमवर दडपण आणता येत असेल. परंतु आम्ही तसं करण्यात अपयशी ठरलो. मला वाटलं होतं की, या पराभवानंतर चाहते आमच्यावर नाराज होतील, पण तसं झालं नाही. सर्वांनी आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला.
कपिल शर्माने रोहित शर्माला प्रश्न विचारला. यामध्ये कपिलने विचारलं की, असा कोणता प्लेयर आहे, ज्याच्यासोबत रुम शेअरिंग करायला आवडत नाही? त्यावर रोहित म्हणला की, आता प्रत्येक खेळाडूंनी वेगवेगळ्या रुम मिळतात. दोन खेळाडू असे आहेत, ज्यांच्यासोबत रुम शेअर करायला आवडणार नाही. एक म्हणजे शिखर धवन आणि दुसरा म्हणजे ऋषभ पंत... यावर कपिलने रोहितला कारण देखील विचारलं.
मला माफ करा पण यांच्यासोबत रुम शेअर करायला मला आवडणार नाही, असं रोहित शर्मा हसत सांगतो. कपिलने रोहितला याचं कारण विचारलं तेव्हा, खुप घाणेरडी लोकं आहेत यारर.. प्रॅक्टिसवरून आली की, कपडे इतकं तिकडं फेकून देणार, यांच्या रुमवर नेहमी डीएनडी बोर्ड लावलेला असतो. कारण ही दोघं 1-1 वाजेपर्यंत झोपलेली असतात. हाउसकीपिंगला दरवाजा उघडावा लागतोय. त्यामुळे यांच्या रूम 4 -5 दिवस तशाच अस्वच्छ असतात, असं रोहित शर्मा म्हणतो.