मुंबई : आयपीएलचे सामने सुरु होण्यासाठी 72 तास शिल्लक आहेत. 26 मार्चपासून हे सामने खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना होणार आहे. आयपीएलमध्ये असे काही रेकॉर्ड आहेत जे मोडणं आजही कठीण आहे. त्यामधील एक रेकॉर्ड कमी बॉलमध्ये शतक ठोकण्याचाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी बॉलमध्ये सर्वात वेगानं शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये एक भारतीय खेळाडू देखील आहे. टॉप 6 लिस्टमध्ये भारतीय खेळाडूचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली नाही तर भारताचा स्टार खेळाडू आहे. कोणी कोणी आयपीएलमध्ये सर्वात जलद गतीनं शतक ठोकले जाणून घेऊया. 


यंदाच्या हंगामात ख्रिस गेल खेळताना दिसणार नाही. मात्र त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद गतीनं शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्टमध्ये त्याचं नाव पहिलं आहे. 2013 मध्ये बंगळुरूकडून खेळताना 66 बॉलमध्ये त्याने 175 धावा केल्या होत्या. 


66 बॉलमध्ये 175 धावा करणारा ख्रिस गेल तेव्हा पहिला खेळाडू ठरला होता. यावेळी त्याने 17 षटकार आणि 13 चौकार ठोकले होते. त्याने अवघ्या 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यावेळी RCB ने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमवून 263 धावा केल्या होत्या. 


आयपीएलमध्ये वेगवान शतक ठोकणारा दुसरा खेळाडू यूसुफ पठाण आहे. हा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून 2010 मध्ये मुंबई विरुद्ध खेळताना 37 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. 


तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने 38 बॉलमध्ये 101 धावा केल्या आहेत. पंजाबकडून खेळताना 2013 मध्ये त्याने हा विक्रम केला. त्याच्या या विक्रमामुळे पंजाबला विजय मिळवता आला होता. 


ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर एडम गिलक्रिस्टने 42 बॉलमध्ये 2008 रोजी शतक ठोकलं आहे. त्याने डेक्कन चार्जर्सकडून खेळून हा विक्रम केला आहे. 12 ओव्हर्समध्ये त्याने हा विजय मिळवला आहे. 


दक्षिण आफ्रिकेकडून माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 43 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. डिव्हिलियर्सने गुजरात लायंस विरुद्ध 52 बॉलमध्ये 129 धावा केल्या आहेत. 


डेव्हि़ड वॉर्नरने देखील 43 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. 59 बॉलमध्ये 126 धावा त्याने केला. तेव्हा तो हैदराबाद संघाकडून खेळत होता. त्याने 8 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं हा विक्रम केला आहे.