एकाच वेळी क्रिकेट खेळत आहे पिता-पुत्राची जोडी!
वडील आणि मुलगा देशासाठी क्रिकेट खेळल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल.
मुंबई : वडील आणि मुलगा देशासाठी क्रिकेट खेळल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण एकाच वेळी दोघं क्रिकेट खेळताना सहसा दिसत नाहीत. मुंबईचे नौशाद खान आणि त्यांचा मुलगा सरफराज खान मात्र याला अपवाद आहेत. नौशाद खान आणि सरफराज खान नुकतेच कांगा लीगमध्ये खेळले. कांगा लीगमध्ये हे दोघं सर्वोत्कृष्ठ खेळाडूंपैकी होते. कांगा लीग ही लोकप्रिय मानसून स्पर्धा आहे. ए डिव्हिजनमध्ये सरफराजनं 284 रन केले. तर त्याचे 48 वर्षीय वडिल नौशाद यांनी यंग मोहम्मदनसाठी बी डिव्हिजनकडून खेळताना 5 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या. यामुळे नौशाद सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू बनले आहेत. सरफराज आयपीएलमध्ये बंगळुरूच्या टीमकडून खेळतो.
एक शानदार बॉलर, प्रशिक्षक आणि वडिल असलेल्या नौशांद यांना त्यांच्या मुलासोबत स्पर्धा करताना आनंद होतोय. मी माझी दोन्ही मुलं सरफराज आणि मुशीर यांना प्रशिक्षण देतो. जेव्हा मी बॉलिंग करतो तेव्हा मी कठोर असतो. यामुळे ते बॅटिंगचा अभ्यास तर करतातच पण माझी बॉलिंगही नियंत्रित राहते, असं नौशाद म्हणाले.
सरफराजनं 8 मॅचमध्ये 363 रन केले तर नौशाद यांनी 10 मॅचमध्ये 32 विकेट घेतल्या. सरफराजनं कांगा लीगमध्ये वडिलांचं 105 रनचं रेकॉर्ड मोडून 109 रनची खेळी केली. माझे वडील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचा आदर्शच मला चांगला क्रिकेटपटू होण्यास मदत करेल, असा विश्वास सरपराजनं व्यक्त केला आहे. एक-दोन वर्षांपूर्वी रणजी खेळण्यासाठी सरफराज मुंबईसोडून उत्तर प्रदेशला गेला होता. पण आता तो पुन्हा मुंबईला परतला आहे.
वेस्ट इंडिजमध्येही पिता-पुत्राची जोडी
वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल यांनाही एकत्र क्रिकेट खेळताना पाहण्यात आलं आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये एका मॅचदरम्यान तेजनारायण शिवनारायणसोबत बॅटिंग करताना रन आऊट झाला होता. वडिलांच्यासमोरच मुलगा रन आऊट झाल्याची क्रिकेट इतिहासातली ही पहिलीच घटना असेल.