Ravindra Jadeja Video: टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये (IND vs AUS test Series) कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. टीम इंडियामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं, मात्र बीसीसीआयकडून (BCCI) त्याला क्लीन चीट देण्यात आलेली नव्हती. त्याच्या फिटनेसवर बीसीसीआयचे अधिकारी देखील लक्ष ठेऊन होते, अशातच आता जडेजा पुर्णपणे फिट झालाय. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो. (Feels great to wear the India jersey again says ravindra jadeja after 5 month comeback latest sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला खूप छान वाटतंय. पाच महिन्यापैक्षा जास्त काळ गेला. मला पुन्हा संधी मिळल्याबद्दल मला आनंद आहे. मागचा काळ माझ्यासाठी अप आणि डाऊन असा होता. जेव्हा तुम्ही पाच महिने संघातून बाहेर असता. तो काळ तुमच्यासाठी तणावाचा असतो. ट्रेनीने मला खुप माझी काळजी घेतली आणि मला खूप वेळ देखील दिलाय, असं जडेजा (Ravindra Jadeja Got Emotional) म्हणताना दिसतोय.


आणखी वाचा - Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो...


रविवारी सुट्टी असते तेव्हा देखील त्यांनी माझी काळजी घेतली, असंही जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला आहे. आता एक मॅच खेळल्यानंतर आता प्रिप्ररेशनसाठी आलोय तर त्याचा देखील मला आनंद आहे. यानंतर जे काही होईल ते चांगलंच होईल, असं जडेजा म्हणताना दिसतोय.


पाहा Video - 



दरम्यान, एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे. यासाठीच त्याचं सिलेक्शन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) करण्यात आलं आहे. मात्र सिरीज सुरु होण्यापूर्वी यो-यो टेस्ट (yo-yo test) देखील पास केली आहे.