Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो...

Suresh Raina On Retirement: निवृत्तीनंतर धोनीला (MS Dhoni Retirement) टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता, असं रैना म्हणाला होता.

Updated: Feb 5, 2023, 05:07 PM IST
Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो...
Suresh Raina, MS Dhoni

Suresh Raina, MS Dhoni: वर्ष होतं 2020... 15  ऑगस्ट रोजी सकाळी सर्वांनी शाळेत ऑफिसमध्ये स्वातंत्र्यदिन (independence day) साजरा केला. सर्वांसाठी आनंदाचा दिवस होता. मात्र, संध्याकाळच्या सात साडेसातच्या सुमारास क्रिकेट जगतातून (Cricket News) वाईट बातमी समोर आली. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) निवृत्ती जाहीर केली. लाखो धोनीच्या चाहत्यांना हा मोठा धक्का होता. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या निर्णयातून सावरताही आले नाही की काही त्यानंतर लगेच अर्ध्या तासात आणखी एक बातमी समोर आली. भारताचा स्टार फिलडर आणि फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina Retirement) देखील निवृत्तीची घोषणा केली. (Why did Raina suddenly decide to retire after Mahendra Singh Dhoni Retirement Decision latest marathi news)

बराच काळ भारतीय संघाबाहेर सुरेश रैनासाठी हा सुवर्णकाळ होता. त्यावेळी त्याला टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळेल, असं म्हटलं जात होतं. मात्र, रैनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रैनाने अचानक निवृत्तीचा (Why Raina suddenly decide to retire?) विचार का केला? 30 मिनिटात असं काय झालं?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. त्यावर आता रैनाने उत्तर दिलंय.

आणखी वाचा - MS Dhoni: धोनीची 'शेवटची मॅच' ऋषभला आधीच माहिती होती, पुस्तकातून झाला खुलासा!

काय म्हणाला रैना (Suresh Raina) ?

मी आणि धोनी (MS Dhoni) एकत्र खूप क्रिकेट खेळलोय. या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला धोनीसोबत टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) एकत्र खेळण्याची संधी मिळाली. आम्ही अनेक सामने एकत्र खेळलोय. आम्हाला खूप प्रेम मिळाले. मी गाझियाबादहून आणि धोनी रांचीहून आला होता. त्यानंतर देशासाठी खेळलो. हे आमच्या दोघांमधील कनेक्शन आहे. मी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी खेळलो, असं सुरेश रैना (Suresh Raina On Retirement) म्हणालाय. 

दरम्यान, आम्ही एकत्र अनेक फायनल खेळलो, 28 वर्षानंतर भारताला विश्वचषक जिंकवून दिला. माही एक महान नेतृत्व करणारा कर्णधार आणि एक महान माणूस देखील होता आणि कायम राहील, असंही रैना यावेळी म्हणालाय. निवृत्तीनंतर धोनीला (MS Dhoni Retirement) टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. निवृत्तीच्या तुझ्या या प्रवासात मी देखील सहभागी होत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद, असं रैना त्यावेळी म्हणाला होता.