Argentina vs Croatia fifa 2022 semi final highlights : सर्वच फुटबॉलप्रेमींच्या नजरा लागून राहिलेल्या लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि त्याच्या संघानं अखेर अपेक्षित कामगिरी करत फिफाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. क्रोएशियाच्या (Croatia) संघाला नमवत अर्जेंटिनानं थेट Finals मध्ये प्रवेश केला आणि अवघ्या क्रीडा विश्वातून या संघावर कौतुकाचा वर्षाव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमी फायनलमध्ये अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि जूलियन अलवारेझ यांनी क्रोएशियाची स्वप्न विखुरली. सामन्यात मेस्सीनं एक तर अलवारेझने दोन गोल केले. हा विजय अर्जेंटिनासाठी खास आहे, कारण 2014 नंतर संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळं आता अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. याआधी 1978 आणि 1986 मध्ये अर्जेंटिना वर्ल्ड चॅम्पियन ठरले होते.










 


पुन्हा पाहायला मिळाली मेस्सीची जादू 


सामन्यात 34 व्या मिनिटाला मेस्सीनं अर्जेंटिनासाठी गोल करत संघाला धीर दिला. पेनल्टीवर त्यानं केलेला हा गोल सामना पाहणाऱ्या प्रत्येकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून गेला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हा मेस्सीचा पाचवा आणि फिफाच्या इतिहासात आतापर्यंतचा 11 वा गोल होता. मेस्सीचा हा गोल म्हणजे त्याचं या खेळावर असणाऱ्य प्रभुत्व सिद्ध करणारं होतं. दरम्यान अर्जेंटिनासाठी दुसरा गोल 39 व्या मिनिटाला जुलियन अलवारेझनं केला. हाफ लाईनवरून एकट्यानं फुटबॉल पुढे आणत त्यानं एकट्यानंच हा सुंदर गोल केला. 


हेसुद्धा वाचा : FIFA WC 2022: मिस्ट्री गर्ल Ivana Knoll हीनं सांगितलं उपांत्य फेरीत कोण जिंकणार? Video Viral



तिसरा गोल सामन्याचा निर्णायक वळण देणारा ठरला 


अर्जेंटिनासाठी 69 व्या मिनिटाला अलवारेझनं तिसरा गोल केला. या गोलसाठी मेस्सीचं कौशल्य आणि त्याचा अद्वितीय खेळ क्रीडाप्रेमींना पाहता आला. क्रोएशियाच्या खेळाडूंना चकवत मेस्सी पेनल्टी एरियापर्यंत आला. तिथेच त्याला क्रोएशियाच्या दोन डिफेंडर्सनी गाठलं आणि ते पाहूनच मेस्सीनं बॉल अलवारेझकडे पास केला. त्यानं अगदी सहजपणे या बॉलची दिशा वळवून त्याला थेट गोलपोस्टमध्ये धाडलं आणि संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.