FIFA Captain Fantastic: भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात फूटबॉलची लोकप्रियता तशी कमीच आहे. मात्र भारतीय फूटबॉलपटू सुनील छेत्री याचं नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे. सुनील छेत्री एक महान फूटबॉलपटू आहे. भारतीय कर्णधाराने आपल्या देशासाठी अनेक गोलची नोंद केली आहे. सध्या तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये तिसरा सर्वात सक्रिय गोल करणारा खेळाडू आहे. फीफाने खेळाडूच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी 'कॅप्टन फॅन्टास्टिक' नावाची एक छोटी सीरिज जारी केली आहे. 'कॅप्टन फॅन्टास्टिक' नावाची मालिका FIFA+ वर उपलब्ध आहे आणि तीन भाग आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोल-स्कोअरिंगमुळे छेत्री फुटबॉलमधील महान खेळाडू, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या पंगतीत स्थान मिळाले आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये 37 वर्षीय सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसरा खेळाडू आहे. 



या यादीत रोनाल्डो 117 गोलांसह अव्वल स्थानावर, मेस्सी 90 गोलसह दुसऱ्या स्थानावर, तर सुनील छेत्री 84 गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीने भारतीय संघासाठी 131 सामने खेळले आहेत आणि 84 गोल केले आहेत.