कोलकाता : अंडर-१७ म्हणजेच १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने स्पेनचा पराभव करत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडने स्पेनचा ५-२ ने पराभव केला आहे. इंग्लंडची टीम चौथ्यांदा टूर्नामेंट खेळत होती तर पहिल्यांदाच फायनल मॅचमध्ये पोहोचलेल्या इंग्लंडने विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.


कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फायनल मॅचमध्ये १२व्या मिनिटाला सर्जिओ गोमेज याने गोल करत स्पेनला १-० ने आघाडी मिळवून दिली. स्पेनने दुसरा गोल ३५व्या मिनिटांनी केला. मग, ४४ व्या मिनिटाला इंग्लंडच्या टीमने गोल केला आणि ५८ व्या मिनिटाला स्कोर २-२ ने बरोबरीत आला.


त्यानंतर फिलिप फोडेननं ६९व्या आणि ८८व्या मिनिटाला गोल केला. त्यासोबतच ८४व्या मिनिटाला मार्क गिहीनं गोल केला. अशाप्रकारे इंग्लडच्या टीमने स्पेनचा ५-२ ने पराभव केला. स्पेनला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.