नवी दिल्ली : भारत पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करत आहे. सोबतच या स्पर्धेत त्यांना सहभाग घेण्याची संधीही मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत एकूण ५२ सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. हे सामने दिल्ली, मुंबई, कोच्ची, गोवा, गुवाहाटी आणि कोलकाता येथे खेळले जातील. चीन, जापान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमीरातीनंतर भारत हा पाचवा एशियाई देश आहे, जो १९८५ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचं आयोजन करत आहे. चला जाणून घेऊया फिफा अंडर १७ वर्ल्ड कपच्या १० रोमांचक गोष्टी....



- एशियामध्ये वर्ल्ड कपचं आयोजन सर्वात जास्त वेळा करण्यात आलं आहे. भारत पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करत आहे. 


- फिफा अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये १९८५ ते २००५ पर्यंत एकूण १६ टीम्स सहभाग घेत होत्या. त्यांना चार विभागात वाटले जायचे. पण २००७ मध्ये टीम्सची संख्या वाढवून २४ केली आहे. 
 
- नायजेरियाची टीम फिफा अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये सर्वात यशस्वी मानली जाते. त्यांनी वर्ल्ड कप पाच वेळा जिंकला आहे. तर तीन वेळा नायजेरिया उपविजेता राहिला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात होत असलेल्या या स्पर्धेत नायजेरियाची टीम क्वालिफाय करू शकली नाहीये. 


- भारतात होत असलेल्या सर्धेत पहिल्यांदाच तीन नवीन टीम्स सहभागी होत आहेत. यात नायजर, न्य़ू कालेडोनिया आणि भारताचा समावेश आहे. 


- अंडर १७ वर्ल्ड कप आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळणा-या खेळाडूंमध्ये मारियो गोट्जे(२०१४), इमानुएल पेटीट(१९९८) आणि आंद्रेस इनिएस्ता(२०१०) तीन असे खेळाडू आहेत, ज्यांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये गोल केले आहेत. 


- अंडर १७ वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त १६६ गोल करण्याचा रेकॉर्ड ब्राझीलच्या नावावर आहे. तर दुस-या स्थानावर १४९ करून नायजेरिया आहे. स्पेन आणि मेक्सिको ९७ गोल करून तिस-या स्थानावर आहे. जर्मनी ९२ आणि घाना ८६ गोल करून या यादीत आहेत. 


- ब्राझील आणि नायजेरिया अशा टीम्स आहेत, ज्यांनी वर्ल्ड कप जिंकले आहेत. ब्राझीलने १९९७ आणि १९९९, नायजेरियाने २०१३ आणि २०१५ मध्ये लागोपाठ दोनदा हा किताब आपल्या नावावर केलाय. 


- अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बॉलचा किताब सर्वात जास्त चार वेळा नायजेरियाच्या खेळाडूंनी मिळवला आहे. 


- भारत अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवणारी एशियाची १८वी टीम आहे. 


- अमेरिका आणि ब्राझील आतापर्यंत सर्वात जास्त १५ वेळा अंडर १७ वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाली आहे. आणि दोन्ही देशांचा हा १६वा वर्ल्डकप आहे.