मुंबई : एका लहान कुत्र्याने फुटबॉल वर्ल्डकप आणि आयोजकांची लाज राखली असं जर कोणी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण असं घडलंय. १९६६ मध्ये वर्ल्डकप चोरीचा किस्सा आपल्यापैकी अनेक फुटबॉलप्रेमींना माहिती नसेल. त्याच झाल असं की फुटबॉल लिगला ४ महिने होते. फुटबॉलची ट्रॉफी दुसऱ्या दिवशी सर्वसामान्यांसाठी पाहण्याला खुली करण्यात येणार होती. तेवढ्यात मोठा घोळ झाला. विनिंग ट्रॉफीच चोरीला गेल्याचे समोर आले. २० मार्च १९६६ ही तारीख आयोजक असलेला इंग्लड देश कधी विसरू शकणार नाही. कोणी म्हणत होत सुरक्षा रक्षकांपैकी कोणीतरी चोरला तर कोणी म्हणे बाहेरचा कोणी आला.  आता करायच काय हा मोठा प्रश्न उभा राहिला. ही ट्रॉफी नेमकी कशी चोरी झाली हे काही आतापर्यंत कळालं नाही. जगभरातील माध्यमांनी हा विषय घ्यायला सुरूवात केली होती. स्कॉडलंड पोलीस दिवस रात्र मेहनत घेत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुटबॉल असोसिएशनने जॉर्ज बर्ड या डिझायनरच्या मदतीने चोरी झालेल्या ट्रॉफीसारखी दिसणारी ट्रॉफी तयार करुन घेतली. असोसिएशनचे मुख्य डेनिस फॉलोस यांनी हे सार गुपित ठेवलं. फीफा प्रेसिंडट स्टैंले यांना देखील विश्वासात घेण्यात आलं. 


२७ मार्चला रविवार होता. साऊथ लंडनच्या नॉरवूडमध्ये राहणारे डेव कॉर्बेट आपल्या घरून फोन करण्यासाठी बाहेर पडले. सोबत त्यांनी आपल्या पाळीव कुत्रा 'पिक्सल'ला सोबत घेतलं. एका कारसमोर पिक्सल कुत्रा सारखा घुटमळत होता. तिथए काहीतरी त्याला दिसलं. त्यावर ब्लॅंक शील्ड दिसली आणि त्यावर ब्राझील, वेस्ट जर्मनी आणि उरग्वेसारखे शब्द लिहिलेले दिसले. डेव कॉर्बेट यानी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांना तर डेव वरच संशय होता. डेव पुन्हा आपल्या घरी पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांचा गऱ्हाडा घरासमोर होता. मीडियाने त्याला हजारो प्रश्न केले. डेवचा कुत्रा पिक्स रातोरात स्टार झाला होता.


पिक्सल द स्टार 


संपूर्ण जग या पिक्सलचे फॅन झाले. नॅशनल केनाइन डिफेंस लीगने पिक्सलला मेडल दिले. त्याला  'डॉग ऑफ द इयर', 'इटेलियन डॉग ऑफ द इयर' असे खूप सारे पुरस्कार मिळाले. ‘द स्पाई विद कोल्ड नोज’या सिनेमातही तो दिसला. वर्ल्ड कप विजयानंतर पिक्सलदेखील आमंत्रित पाहुण्यांपैकी एक होता. याठिकाणी महत्त्वाच्या प्लेअर्सच्या बायका-मुलांनादेखील आमंत्रण नव्हते तिथे पिक्सल प्रमुख पाहुणा होता. 


एका वर्षात गेला 


वर्षभरातच पिक्सलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. आपल्या घरातच तो गार्डनला मृतावस्थेत दिसला. तो कोणत्यातरी मांजरामागे धावत होता तेव्हा चैनीमुळे त्याचा गळा कापला गेल्याचे त्याच्या मालकाने सांगितलं. लिंगफिल्डच्या कॉर्बेट्स गार्डनमध्ये त्याला दफन करण्यात आलं.