Fifa World Cup 2022:  जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा FIFA वर्ल्डकप 2022 येत्या 20 तारखेपासून सुरू होतोय. यावेळी यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना हा कतार आणि इक्वेडोर यांच्यात रंगणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी खेळाडूंसोबतच जगभरातून करोडो चाहते आता कतारला पोहोचलेत. मात्र इथे पोहोचण्यापूर्वी नियमांची पूर्ण माहिती असणेही आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतारने फुटबॉल वर्ल्डकपबाबत अतिशय कडक नियम केलेत. जर या नियमांचं पालन झालं नाही तर दंड आणि तुरुंगवास देऊ शकतो.


कतारमध्ये येणाऱ्या फॅन्सना हय्या कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे. हे हय्या कार्ड हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे ज्यामुळे कतारमध्ये कुठेही प्रवास करता येणार आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड असणार आहे त्यांना मेट्रो आणि बसमध्येही मोफत प्रवास करता येईल. या कार्डमुळे कतारमध्ये जाण्यासाठी तसंच व्हिसाची गरज भासणार नाहीये. हैया कार्डधारक 23 जानेवारीपर्यंत कतारमध्ये राहू शकतात. 


काय आहेत नियम?


दारूसंदर्भात नियम


आयोजकांच्या म्हणण्यानुसार, ज्यांच्याकडे लायसन्स आहे ते रेस्टॉरंट्स आणि देशभरातील अनेक हॉटेल्समध्ये अल्कोहोल दिलं जाणार आहे. फॅन झोनमध्ये दारूविक्री हॉटेल्सपेक्षा कमी खर्चात होऊ शकते. कतारमध्ये दारू आणण्यास मनाई आहे. त्यामुळे फॅन झोनच्या बाहेर पर्यटकांसाठी दारू पिण्यावर बंदी असेल. जर कोणी कायद्यांचं उल्लंघन केलं तर त्या व्यक्तींला सुमारे 67 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.


लसीकरणात सूट मिळाली


कतारला जाण्यासाठी कोरोना-19 लसीकरण अनिवार्य नाही, परंतु सहा किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणालाही कतारला जाण्यापूर्वी विमानतळावर कोविड-19 चा निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट दाखवावा लागेल. RTPCR टेस्टचा रिपोर्ट 48 तासांपूर्वीचा नसावा. 


सेक्शुअलिटी संदर्भात नियम


अविवाहित महिला आणि पुरुष यांच्यातील संबंध कतारमध्ये गुन्हा मानण्यात येतो. अशा परिस्थितीत लग्न न झालेल्या जोडप्यांना हॉटेलमध्ये रूम न देण्याच्या सूचना दिल्यात. याशिवाय कतारमध्ये समलैंगिकता देखील गुन्हेगारी आहे. याचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 


ड्रेस कोड


कतारच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटने पर्यटकांना संस्कृतीचा आदर करण्याबद्दल सांगितलंय. महिला फॅन्सना खांदे आणि गुडघे झाकण्यास सांगण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी लांब स्कर्ट तसंच पँट घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.