FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल World Cup 2022 चे पहिले दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज खेळवले जात आहे. पाचवेळा विजेदेपद पटकावणारा ब्राझील आणि गतवेळीचा उपविजेता संघ क्रोएशिया (Brazil vs Croatia) यांच्या आज सामना रंगला होता. या सामन्यात धक्कादायक निकाल लागल्याचं पहायला मिळतंय. अटीतटीच्या या सामन्यात अखेर पेनल्टी शुट आऊटमध्ये (Penalty shoot out) क्रोएशियाने ब्राझिलचा पराभव केला आहे. पेनल्टी शुटआऊटमध्ये ब्राझीलने 4-2 ने पराभव केला आहे. ब्राझीलच्या पराभवानंतर त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. (FIFA World Cup 2022 Croatia win 4-2 on penalties, favourites Brazil exit the tournament marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याच्या 105 व्या मिनिटाला नेमारने (Neymar) गोल करत ब्राझीलच्या चाहत्यांना उत्सव साजरा करण्याची संधी दिली. मात्र, ब्राझीलच्या चाहत्यांचा त्यानंतर 11 व्या मिनिटाला हिरमोड झाला. 116 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोविकने गोल नोंदवला आणि मॅचमध्ये वातावरण तापलं.



त्यानंतर अखेर सामना ड्रॉ होत असताना पेनल्टी शूट आऊटने (Penalty shoot out) निकाल लागला. क्रोएशियाकडून मिस्लाव ओरसिक, लुका मॉड्रिच,लोवरो मजर आणि निकोला व्लासिक यांनी पेनल्टी गोल करत क्रोएशियाचं वर्चस्व कायम ठेवलं. तर ब्राझीलकडून (Brazil) पेड्रो आणि केसमिरो यांना पेनल्टी गोल करता आले. रॉड्रिगोने सोनेरी संधी हुकवली आणि क्रोएशियाच्या (Croatia) गोत्यात एकच जल्लोष सुरू झाला.


आणखी वाचा - Fifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक


दरम्यान, दोन्ही संघांमध्ये एकूण 4 सामने झाले आहेत, त्यापैकी ब्राझीलने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर क्रोएशियाने (Brazil vs Croatia) विरोधी संघाला एकदा बरोबरीत रोखलं होतं. अशा स्थितीत क्रोएशियाचा प्रथमच ब्राझीलचा (Croatia win 4-2 on penalties) किल्ला भेदला आहे.