FIFA World Cup 2022: अर्जेंटीनाचा कर्णधार Lionel Messi दुखापतग्रस्त? चाहत्यांना मोठा धक्का
अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.
FIFA World Cup 2022: रविवार 20 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून कतारमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) ला सुरूवात होतेय. यामध्ये पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये ज्यांच्यावर खास लक्ष असणार आहे त्यामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू लिओन मेस्सीचा (Lionel Messi) समावेश होतो. मेस्सीच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. मात्र टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वीच मेस्सीच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाचा कर्णधार कदाचित पहिल्या सामन्यात टीमचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक वाईट बातमी असू शकेल.
अर्जेटींनाची टीम त्यांच्या यंदाच्या फीफा वर्ल्डकपची सुरुवात 22 नोव्हेंबर रोजी करणार आहे. या दिवशी अर्जेंटींना आऊजी अरेबियाशी मुकाबला करणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीमचे 5 खेळाडू दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे. टीमचे मिड फिल्डर रोड्रिगो डी पॉल आणि लिएंड्रो परेडेस दुखापग्रस्त असल्याने त्यांना सुरुवातीच्या सामन्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तर अर्जेंटीनाच्या अडचणी काही इथेच थांबत नाही. स्ट्रायकर एंजेल डि मारियासोबत डिफेंडर निकोलस ओटामेंडी प्रॅक्टीस सेशनमध्ये नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तर या 4 खेळाडूंसोबत आता लियोनेल मेस्सीचं नाव देखील जोडलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, साऊदी अरेबियासोबत असलेल्या सामन्यापूर्वी टीमचा स्टार खेळाडू आणि अर्जेंटीना टीमचा कर्णधार लिओनेल मेस्सी देखील दुखापतग्रस्ती झाला होता. दुखापत झाल्यामुळे तो वेगळ्या प्रॅक्टीस सेशनमध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान टीम मॅनेजमेंटने याबद्दल अजून काही खुलासा केलेला नाही.