FIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
FIFA Final Argentina vs France : 18 डिसेंबर म्हणजेच आज (रविवारी) फिफाचा फायनल (FIFA World cup 2022) सामना रंगणार आहे. कतारच्या Lusail Stadium हा सामना रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. तसेच फ्रान्स सध्याचा विश्वविजेता आहे, तर अर्जेंटिनाने अखेरचा विश्वचषक 1968 मध्ये जिंकला होता. या दोन्ही संघांमध्ये रोमांचलक सामना पाहायला मिळणार आहे.
दर चार वर्षांनी येणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात सन 1930 पासून झाली होती. सध्या कतारमध्ये सुरु असलेला विश्वचषक धरून एकूण आतापर्यत 21 विश्वचषकांच्या आवृत्या झाल्या आहेत. युरोपियन देशांनी सर्वाधिकवेळा या विश्वचषकावर नाव कोरले आहे.
कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवर रविवारी फिफा विश्वचषक स्पर्धेचा 2022 अंतिम (FIFA World Cup 2022) सामना रविवारी खेळवला जाईल. यावेळी फ्रान्सचा संघ 2018 चा जगज्जेता आहे. अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. आता फ्रांस सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणारा 60 वर्षांतील पहिला संघ बनण्याच्या अगदी जवळ आहे. एम्बाप्पेच्या फ्रांस संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. पण दुसरीकडे मेस्सीचा अर्जेंटिना संघ त्याला हा विक्रम मोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. जर मेस्सी मैदानावर उतरला तर मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळेल.
वाचा : "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
तसेच फ्रान्सच्या विजयाची जबाबदारी स्टार स्ट्रायकर कीलियन एम्बाप्पे आणि ओलिवर जिरूड या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. त्याचवेळी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी अंतिम सामना जिंकून विजेतेपदासह विश्वचषकातून निरोप घेऊ इच्छितो, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे.
कोण होणार विश्वविजेता?
विश्वचषक विजेतेपदासाठी फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोघांनीही अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यामागून एक पाऊल दूर आहे, तर अर्जेंटिनाच्या संघाला जगज्जेता होण्याची संधी आहे. दोन्ही संघांमधील सामना चुरशीचा होणार आहे. फ्रान्सचा संघ आणि अर्जेंटिनाचा दोन्ही संघाचा खेळही आक्रमक आहे, त्यामुळे सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.