Fifa World Cup 2022: जगभरात सध्या फुटबॉलचा फिवर आहे. अनेक जण फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup 2022) पाहत आहेत. यातीलच एका वर्ल्ड कप सामन्यात विचित्र घटना घडली आहे. या घटनेत दोन खेळाडू एकमेकांमवर आदळले आहेत. दोघांची टक्कर इतकी जोरदार झाली की गोलरक्षक अलीरेझा बॅरोनवंड (alireza beiranvand) यांच नाक तुटल आणि रक्तस्त्राव सुरु झाला. या घटनेनंतर काही काळासाठी खेळ थांबवला होता. आता या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. 


खेळाडूंची भीषण टक्कर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिफा वर्ल्ड कप 2022 (Fifa World Cup 2022) मध्ये खलिफा स्टेडियमवर आज सोमवारी रंगलेल्या सामन्यात इराणला इंग्लंडकडून (iran vs england) 2-6 असा पराभव पत्करावा लागला. सामन्यादरम्यान, इराण (iran) संघासाठी एक दुःखद घटना घडली, त्याचा गोलरक्षक अलीरेझा बॅरोनवंड गंभीर जखमी झाला. खेळाच्या 12व्या मिनिटाला त्याची सहकारी खेळाडू माजिद हुसैनीशी त्याची टक्कर झाली. त्यामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.


मैदानात स्ट्रेचवर बोलावली


दरम्यान या घटनेनंतर वैद्यकीय पथक मैदानात आले होते.या पथकाने अलीरेझा बॅरोनवंड (alireza beiranvand) वर योग्य उपचार केले. उपचार केल्यानंतर बॅरोनवंड थोड्या काळासाठी खेळात राहिला. पण 19व्या मिनिटाला तो पुन्हा खेळपट्टीवर पडला, त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर घेऊन मैदानाबाहेर नेण्यात आले. यानंतर इराणच्या संघात समाविष्ट असलेल्या चार गोलरक्षकांपैकी एक असलेल्या होसेन होसेनीने 19व्या मिनिटाला मैदानात प्रवेश केला. 



दरम्यान फुटबॉलच्या (Fifa World Cup 2022) मैदानात अशा अनेक घटना घडत असतात.मात्र या घटनेने अनेक फुटबॉल प्रेमींना धक्का बसला आहे. या घटनेचे फोटो आता व्हायरल होत आहेत.