Fifa World Cup Quarter Finals Schedule : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये (Lionel Messi) मेस्सी-रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कधी आमने-सामने येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारण या दोघांना शेवटचे एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे. हा दोघांसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo)  पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पण आता मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात सामना कधी होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र उपांत्यपूर्व फेरीत मेस्सी आणि रोनाल्डोमध्ये भिडणार नाही आहे, हे मात्र नक्की. 


मेस्सी- रोनाल्डोची स्पर्धा होणार नाही


मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तर पोर्तुगाल संघाला मोरोक्कोचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीनंतर उपांत्य फेरीत (Lionel Messi) मेस्सी आणि रोनाल्डोची (Cristiano Ronaldo)  स्पर्धा होणार नाही, हीही चाहत्यांच्या निराशेची बाब आहे. याचे कारण म्हणजे अर्जेंटिनाने आपला सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत त्याचा सामना नेमारच्या संघ ब्राझील किंवा क्रोएशियाशी होईल.दुसरीकडे, रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना किलियन एमबाप्पेच्या फ्रान्स किंवा हॅरी केनच्या संघ इंग्लंडशी होईल. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत मेस्सी-रोनाल्डोची स्पर्धा दिसणे क्वचितच शक्य आहे.


...तरचं आमने-सामने येणार


दरम्यान जर या दोघांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला तर फायनलमध्ये त्यांच्यात नक्कीच टक्कर होऊ शकते. हा विजेतेपदाचा सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे.


क्वार्टर फाइनल आणि सेमी फायनलचे वेळापत्रक... (भारतीय वेळेनुसार)


9 डिसेंबर - ब्राझील विरुद्ध क्रोएशिया (रात्री 8.30)
9 डिसेंबर - अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स (सकाळी 12.30)
10 डिसेंबर - पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को (रात्री 8.30)
10 डिसेंबर - इंग्लंड विरुद्ध फ्रान्स (दुपारी 12.30)


सेमी फायनलचे वेळापत्रक


13 डिसेंबर - ब्राझील/क्रोएशिया विरुद्ध अर्जेंटिना/नेदरलँड्स (12.30 PM)
14 डिसेंबर - पोर्तुगाल/मोरोक्को विरुद्ध इंग्लंड/फ्रान्स (12.30 PM)


तिसऱ्या स्थानासाठी लढत


17 डिसेंबर - उपांत्य फेरीतील दोन पराभूत खेळाडूंमधील सामना (रात्री 8.30 वाजता)


अंतिम सामना


18 डिसेंबर - दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमधील सामना (रात्री 8.30 वाजता)