FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane). रविवारी पार पडणाऱ्या या सामन्यासाठी सध्या दोन्ही संघ आपआपली रणनिती आखण्यामध्ये व्यग्र आहेत. (Football) फुटबॉलप्रेमीसुद्धा फिफाच्या अंतिम (Fifa world cup final match) सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता खेळाडू कोणते शूज घालणार इथपासून फायनल्ससाठी कोणाची प्रमुख उपस्थिती असणार असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करत आहेत. यात विजेत्या आणि उपविजेत्या संघाला फिफाकडून बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार हा प्रश्नही उपस्थित केला जातोय. 


हेसुद्धा पाहा :  FIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का 


बक्षीसाची रक्कम पाहून त्यापुढे लागणारे शून्य मोजत राहाल (FIFA World Cup 2022 prize money


स्पर्धा कोणतीही असो विजेता एकच असतो आणि त्याचा घसघशीत बक्षीस मिळतं हा अलिखित नियम. फिफाही त्याला अपवाद नाही. यंदाच्या वर्षी फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला तब्बल $42 million म्हणजेच 347 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघासाठी $30 million म्हणजेच 247 कोटी रुपये मिळणार आहेत. हा एकूण आकडा पाहिल्यास अंतिम सामन्यात फक्त बक्षीसपात्र रकमेसाठी तब्बल $72 million इतकी रक्कम दिली जाणार आहे. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाला फिफाकडून  $27 million म्हणजेच 220 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघाला $25 million इतकी दणदणीत रक्कम दिली जाईल.