FIFA World Cup 2022 Fans Chant On Stadium​: आखाती देशात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्डकपचं (FIFA World Cup) आयोजन केलं असून 32 संघांनी भाग घेतला आहे. जगभरातील क्रीडा रसिकांसाठी फुटबॉल वर्ल्डकप म्हणजे पर्वणीच आहे. फीफा वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सलामीच्या सामन्यातच इक्वॉडोरनं यजमान कतारला पराभवाची धूळ चारली. इक्वॉडोरनं कतारचा 2-0 ने पराभव केला. मात्र कतारमध्ये स्पर्धेचं आयोजन वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. कतारमधील बंधनांमुळे अनेक क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. आता इक्वॉडोर आणि कतार सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यात स्टेडियममधील प्रेक्षक जोरकसपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. इतकंच काय तर समूहाने एका सुरात मागणी केल्याने आयोजकांनाही विचार करण्यास भाग पडलं आहे. 


प्रेक्षकांनी केली बिअरची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी आम्हाला बिअर पाहिजे अशा घोषणा दिल्या. प्रेक्षकांच्या हातात पोस्टर आणि बॅनरही होते. हा व्हिडीओ वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील असल्याचं बोललं सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, वर्ल्डकप सुरु होण्याच्या दोन दिवसाआधी बिअर विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. पण अल्कोहल मुक्त बिअरची विक्री केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. फीफानं याबाबतची माहिती दिली होती. मात्र या निर्णयाविरोधात प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये आवाज बुलंद केला असून बिअरची मागमी केली. 



बातमी वाचा- FIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही


व्हायरल व्हिडीओनंतर वाद


इतिहासातील हा पहिला फुटबॉल विश्वचषक आहे. ज्यामध्ये बिअरवर बंदी घालण्यात आली आहे. आपल्या एका निवेदनात फीफाने सांगितले होते की, यजमान देश आणि FIFA च्या अधिकार्‍यांमध्ये चर्चेनंतर स्टेडियम जवळ बिअरची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अधिकृतपणे कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. कतार हा इस्लामिक देश असून तिथल्या नियमांमुळे विश्वचषक स्पर्धेत दारूवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय आयोजकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो आणि मागे घेण्याची शक्यता आहे.