FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...
Argentina Vs France: फुटबॉल कळत नसलं तरी जगभरातील अनेक लोकं वर्ल्डकप आवडीने पाहतात. अनेक देश या स्पर्धेसाठी क्वालिफाय देखील करत नाहीत. मात्र अशा देशांमध्येही फुटबॉलचे चाहते आहेत. फीफा वर्ल्डकपच्या रोमांचक अशा सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. जवळपास 36 वर्षानंतर अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं आहे
FIFA World Cup Final Argentina Vs France: फुटबॉल कळत नसलं तरी जगभरातील अनेक लोकं वर्ल्डकप आवडीने पाहतात. अनेक देश या स्पर्धेसाठी क्वालिफाय देखील करत नाहीत. मात्र अशा देशांमध्येही फुटबॉलचे चाहते आहेत. फीफा वर्ल्डकपच्या रोमांचक अशा सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. जवळपास 36 वर्षानंतर अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं आहे. 2014 मध्ये लियोनेल मेस्सीला ही संधी चालून आली होती. मात्र अंतिम सामन्यात जर्मनीनं त्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं. 2018 मध्ये सुपर 16 फेरीत फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 ने पराभव केला. त्यामुळे 2022 पर्यंत मेस्सीला वर्ल्डकपची वाट पाहावी लागली. या विजयासह मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. प्रत्येक खेळाडू आनंदाने नाचत होता. त्यानंतर खेळाडूंनी ज्या गोल पोस्टवर विजय मिळवला त्या गोल पोस्टची जाळी कापली. पण असं करण्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात यामागचं कारण
नेट कापून जाळणं हा एक श्रद्धेचा भाग आहे. अर्जेंटिनियन लोकं कोणतंही शुभ कार्य पार पाडल्यानंतर तेथील वस्तू जाळून त्याची राख सोबत ठेवतात. त्यामुळे ही नेट कापली असल्याचं सांगितलं जातं. काही खेळाडूंनी जल्लोष करताना नेट कापून आपल्या मनगटावर बांधली होती. फीफानं या संबंधित काही फोटो ट्वीट देखील केले आहेत.
पेनल्टी शूटआउटमध्ये फ्रान्सकडून पहिला गोल एम्बाप्पेनं मारला. त्यानंतर मेस्सीनं या गोलची बरोबरी केली. मात्र दुसरा गोल मारण्यात फ्रान्सच्या किंग्सले कोमनला अपयश आलं. तर अर्जेंटिनाच्या पाउलो डायबालानं गोल झळकावत 2-1 ने आघाडी घेतली. तिसरा गोल झळकावण्यात फ्रान्सच्या ओरेलिनला अपयश आलं. त्यानंतर अर्जेंटिनाच्या लिंयाद्रो पॅरेडसनं तिसरा गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. फ्रान्सकडून चौथी संधी मौनीला मिळाली त्याने गोल मारत 3-2 अशी स्थिती केली. तर अर्जेंटिनाच्या गोनझॅलो मोनशियलनं निर्णायक गोल मारत अर्जेंटिनाला 4-2 ने विजय मिळवून दिला.
मेस्सीचं वय 35 वर्षे असल्यानं या विश्वचषकात खेळणार की नाही? यााबाबतही चर्चा रंगली होती. मात्र मेस्सीला फक्त वर्ल्डकप विजयाची स्वप्न पडत होती. कोपा अमेरिका चषकावर नाव कोरल्यानंतर फक्त वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण करणं बाकी होतं. 2022 वर्ल्डकप स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं ते पूर्ण केलं.