FIFA World Cup 2022: चॅम्पियन ब्राझीलला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू `नेमार` संघातून आऊट!
Brazilian football player Neymar: खेळताना (Brazil vs Serbia) नेमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो बेंचवर बसल्याचं दिसलं. त्यानंतर तो लॉकररूममध्ये जाऊन बसला. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आलं.
Neymar FIFA World Cup 2022: फुटबॉलचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कपला (FIFA World Cup 2022) रंगतदार सुरूवात झाली आहे. ग्रुप स्टेजमधील सामन्यात काही थरारक मॅचेस पहायला मिळत आहेत. एक दोन नव्हे तर पाच वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन राहिलेल्या ब्राझीलने (five time champion brazil) यंदा विजयी सलामी दिली. ब्राजीलने (Brazil vs Serbia) सर्बियाला 2-0 ने धुळ चारली. ब्राझीलच्या अनेक विजयात नेमारचा (Neymar) सर्वात मोठा वाटा राहिलाय. मात्र, सध्या हाच नेमार जखमी (Neymar Injured) असल्याने संघातून बाहेर पडला आहे. (fifa world cup big blow to five time champion brazil star player neymar out of next match)
नेमार संघातून बाहेर -
नेमार आणि व्हिनिसियस ज्युनियरने संधी गमावल्यानंतर रिचार्लिसनने (Richarlison) 62 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. त्यानंतर 73व्या मिनिटाला व्हिनिसियसच्याच क्रॉसवरून रिचर्लिसनने अॅक्रोबॅटिक गोल (Acrobatic Goal) केला. त्यावेळी दुसऱ्या हाफमध्ये नेमार दुखापतीचा शिकार झाला. खेळताना नेमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो बेंचवर बसल्याचं दिसलं. त्यानंतर तो लॉकररूममध्ये जाऊन बसला. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आलं.
नेमारची मेडिकल टेस्ट करण्यात आली. टेस्टनंतर त्याच्यावर सांघिक हॉटेलमध्ये उपचार सुरू आहेत. आता दुखापतीमुळे नेमार फिफा विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधून (Fifa Group Stage Matches) बाहेर पडला आहे. ब्राझील संघाच्या डॉक्टरांनी याची पुष्टी केली आहे. ब्राझीलचा आगामी सामना 28 नोव्हेंबर रोजी स्वित्झर्लंडविरुद्ध (Brazil vs Switzerland) होणार आहे. या सामन्यात (Neymar out of next match) नेमार खेळणार नाही, हे पक्कं झाल्याचं दिसतंय.
आणखी वाचा - स्टार खेळाडूला अॅडल्ट स्टारची खुली ऑफर, World Cup जिंकून दिल्यास...
दरम्यान, सर्बियाविरुद्धच्या सामन्यात (Brazil vs Serbia) निकोला मिलेन्कोविचशी टक्कर झाल्यानंतर नेमारला दुखापत झाली होती, मात्र त्यानंतर देखील तो 10 मिनिटे खेळत राहिला. मात्र, त्रास झाल्याने त्याला अखेर लॉकर रूममध्ये जावं लागलं. मात्र, सामन्यानंतर नेमारच्या खेळाडूवृत्तीचं देखील कौतूक होताना दिसत आहे.