T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) चा आज 39 वा सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडसाठी 'करो या मरो'ची परिस्थिती निर्माण करणारा होता. अखेर हा सामना जिंकून इंग्लंडच्या (England team) टीमने सेमीफायनलमध्ये बाजी मारली. या सामन्यानंतर सेमीफायनलचा (Smenifinal) रस्ता मोकळा झाल्याने इंग्लंडचे खेळाडू फार खुश होते. दरम्यान सामन्यापूर्वी इंग्लंडच्या दोन खेळाडूमध्ये झालेला वाद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओही (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Ben Stokes दिला मार्क वुडला धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडची टीम श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी फोटोशूट करत होती. या फोटोशूटसाठी टीमच्या सर्व खेळाडूंना खुर्चीवर बसण्यास सांगितलं होतं. या फोटोशूटवेळी बेन स्टोक्स आणि मार्क वुड मजा-मस्ती करताना दिसले. बेन फोटो काढण्यासाठी खुर्चीवर बसायला येतो, त्यापूर्वीच मार्क खुर्चीवर बसलेला असतो. यावेळी बेन खुर्चीवर येताच मार्क मुद्दाम खुर्चीवरून खाली पडतो.


या प्रकारानंतर मार्क जेव्हा पुन्हा बसतो तेव्हा तो त्याच्या खांद्याला धक्का देऊन स्टोक्सला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. यानंचर बेन जोरात मार्क धक्का देतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. या दोघांची मजा-मस्तीतील धक्काबुक्की कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडलाय.



इंग्लंडचा विजय


या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 142 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या 42 रन्सच्या खेळीने इंग्लंडने अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. सामन्याच्या मध्ये एक वेळ अशी आली होती, जेव्हा इंग्लंड हा सामना हरेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बेन स्टोक्सने शेवटी आपल्या टीमला सेमीफायनपर्यंत पोहोचवलंच.


ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा मावळल्या


हा सामना यजमान टीम ऑस्ट्रेलियासाठीही (Australia) महत्त्वाचा होता. आजच्या या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.