India Champions vs South Africa Champions : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या 15 व्या सामन्यात युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या चॅम्पियन्सने साऊथ अफ्रिका चॅम्पियन्सचा पराभव केला अन् सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 54 धावांनी पराभव झाला. या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 210 धावा केल्या होत्या. या सामन्यात (Yusuf Pathan And Irfan Pathan Fight) चर्चेत राहिला तो युसूफ आणि इरफान या पठाण बंधूंचा वाद..!


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची फलंदाजी सुरू असताना, इरफान पठाण (Irfan Pathan) आपला भाऊ युसूफ पठाणवर (Yusuf Pathan) चांगलाच संतापला. धाव घेताना झालेलया गोंधळात विकेट गमवावी लागल्याने इरफान पठाण संतापला. 19 व्या ओव्हरला डेल स्टेनच्या गोलंदाजीवर इरफानने उंच फटका लगावला होता. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरले. यादरम्यान इरफान आणि युसूफने एक धाव काढली. पण दुसरी धाव घेताना त्यांच्यात गोंधळ उडाला. इरफान दुसऱी धाव घेण्यासाठी पळाला होता. सुरुवातील युसूफही पुढे आला होता. पण नंतर युसूफने माघार घेतली आणि याच गोंधळात इरफानला विकेट गमवावी लागली. 


चुकीचा कॉल दिल्याने इरफाण पठाण प्रचंड नाराज झाला होता. त्याने भर मैदानात युसूफला झापलं. तर युसूफने देखील माझा कॉल होता, म्हणत त्याला प्रत्युत्तर दिलं. भर सामन्यात झालेल्या वादामुळे सामन्याचं वातावरण चांगलंच पेटलं होतं. मात्र, सामना झाल्यानंतर दोन्ही भावांची दिलजमाई झाली. धाकट्या भावाने थोरल्या भावाला माफ केलं. इरफानने सामना संपल्यानंतर युसूफच्या माथ्यावरची किस केलं अन् वाद मिटवला.


पाहा Video



दरम्यान, इरफान पठाणने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका मिम्सच्या स्वरुपात इरफानने हा व्हिडीओ शेअर केला. जेव्हा भाऊ घरी एकटे असतात तेव्हा.... अन् भाऊ जेव्हा घरच्यांसमोर असतात तेव्हा.. असं इरफानने म्हटलं आहे. तर सर्व भावाभावांसाठी ही घटना लागू होते, असंही इरफानने यावेळी म्हटलंय.