2023 World Cup: भारतीय हॉकी टीम (Hockey Team India) क्रॉस ओव्हर सामन्यामध्ये आज न्यूझीलंडशी (Ind vs NZ) भिडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह (Hardik Singh) दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. हार्दिक दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अखेरीस तो एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्ड कपमधून (FIH World Cup 2023) बाहेर पडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जानेवारी रोजी हार्दिक इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात हार्दिक जखमी झाला होता. याशिवाय तो वेल्सविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता.


टीम इंडियाला मोठा धक्का


हार्दिकच्या अनुपस्थितीत भारताला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडिया जर रविवारी क्रॉसओवरमध्ये न्यूझीलंडला मात देण्यात यशस्वी झाली तर भारत क्वार्टर फायनलमध्ये धडक देणार आहेत. यामध्ये त्यांचा सामना बेल्जियमविरूद्ध होणार आहे. 


टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात स्पेनविरूद्ध गोल करणाऱ्या हार्दिकची जागा सध्या राजकुमार पाल याने घेतली आहे. हॉकी इंडियाच्या म्हणण्यानुसार, "हार्दिक एफआयएच वर्ल्ड कपच्या पुढील स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये. वेल्स सामन्यानंकर विश्रांती दिल्यानंतर आणि त्याच्या दुखापतीची माहिती घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध हा निर्णय घेण्यात आला आहे."


कोच ग्राहम रीड यांचं स्पष्टीकरण


भारतीय कोच ग्राहम रीड यांच्या म्हणण्याप्रमाणे, आम्हाला न्यूझीलंडविरूद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांसाठी हार्दिक सिंहच्या जागी दुसरा खेळाडू खेळवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. आम्हाला सुरुवातीला त्याची दुखापत फारशी गंभीर वाटली नाही. मात्र रिहॅबिलीटेशननंतर त्याला मैदानावर पाहिल्यावर आम्हाला समजलं की, त्याला परतण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. आम्ही हार्दिकच्या जागी राजकुमार पालला टीममध्ये संधी देणार आहोत."


हार्दिकटी भावनिक पोस्ट


दुखापतीनंतर हार्दिकने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हार्दिक म्हणतो, दुर्दैवाने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे माझं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलंय. मुळात प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं आणि माझ्यासोबत असं का घडलंय, हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 


हार्दिक पुढे म्हणाला, यामुळे मी निराश आहे कारण टीमसाठी मी माझं योगदान देऊ शकत नाही. पण आमच्यासाठी स्पर्धा अजून संपलेली नाही."