वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीला धक्का, रात्री 1:30 वाजता पोलिसांची धडक कारवाई
Fir on virat kohli restaurant: एकीकडे वर्ल्ड कप जिंकवून आलेल्या विराट कोहलीला भारतात येताच मोठा धक्का बसला आहे. काल रात्री विराटच्या रेस्टॉरेंटवर कारवाई करण्यात आलीये.
Virat Kohli News: नुकतंच टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. हा वर्ल्ड कप जिंकवून देण्यामध्ये टीम इंडियाचा किंग विराट कोहलीचा मोठा हात होता. भारतात पोहोचताच विराटचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वेस्ट इंडिजवरून वर्ल्ड कपनंतर भारतात परतल्यावर विराट त्याच रात्री लंडनला रवाना झाला. त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलं लंडनमध्ये आहेत. तर आता दुसरीकडे भारतात विराटच्या रेस्टॉरंटविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही गोष्ट बंगळूरूमध्ये स्थित असलेल्या One8 Commune प्रकरणाशी संबंधित आहे. नेमकं काय झालं? यावर पोलिसांनी भाष्य केलंय.
बंगळुरूच्या एमजी रोडवर विराट कोहली असलेल्या सहमालकीच्या पबविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली अन् एफआयआर नोंदवला आहे. त्यावर डीसीपी सेंट्रल यांनी माहिती दिली. आम्ही रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर कारवाई केली आहे, असं डीसीपी सेंट्रलने सांगितलं. आम्हाला मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जात असल्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर आम्ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. पब फक्त रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, पण यांनी त्याहून अधिक वेळ सुरू ठेवलं होतं, असंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.
विराट कोहलीचा बंगळुरूमधील हा पब गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच सुरू झाला होता. हा पब रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे. अनेकदा मुलाखतीमध्ये विराटने या वन 8 कम्युनचा उल्लेख केला आहे. बंगळुरू शहर माझ्या हृदयाच्या जवळ आहे, त्यामुळे मी बंगळुरूमध्ये रेस्टॉरंट उघडण्याचा निर्णय घेतला होता, असं विराट कोहलीने म्हटलं होतं.
दरम्यान, मुंबईत विजयाची रॅली पार पडल्यानंतर विराट कोहली थेट लंडनला आपल्या कुटूंबियांकडे गेला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे आता विराट जास्तीत जास्त वेळ कुटूंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतोय.