ICC ने केलं थेट Suryakumar yadav ला कॅप्टन; टीम इंडियातील `या` चार धुरंधरांची निवड!
ICC Men`s T20I Team : आयसीसीच्या संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) याला कॅप्टन करण्यात आलंय. तर टीम इंडियाच्या चार धुरंधारांना संघात सामिल करण्यात आलंय.
ICC Men's T20I Team of the Year for 2023 : यंदाच्या वर्षी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 WC 2024) खेळवला जाणार आहे. अशातच आता आयसीसीने (ICC) मागील वर्षातील बेस्ट बेस्ट टी-ट्वेंटी संघ जाहीर केला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) याला कॅप्टन करण्यात आलंय. तर टीम इंडियाच्या चार धुरंधारांना संघात सामिल करण्यात आलंय. यामध्ये टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर एक स्पिनर आणि फास्टर गोलंदाजाला देखील सामील केलंय.
नुकताच आयसीसीने 11 स्टार खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांनी मागील वर्षी 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने, गोलंदाजीने आणि ऑलराऊंड कामगिरीने सर्वांना चकित केलंय. अशा 11 खेळाडूंना लीड करणारा खेळाडू भारतीय आहे. सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना बेस्ट 11 संघात स्तान देण्यात आलंय.
भारतीय खेळाडू व्यतिरिक्त फिल सॉल्ट याचा देखील समावेश आहे. तर वेस्ट इंडिजचा स्टार निकोलस पुरन याचं देखील नाव आहे. तसेच न्यूझीलंडचा मार्क चेपमॅनचा देखील संघात समावेश आहे. झिब्बॉव्वेचा सिकंदर राजा आणि रिचर्ड नगावारा यांचं नाव समील आहे. तर आयर्लंडचा मार्क अडियर याचं नाव देखील आहे. अशातच आता युगांडाच्या अल्पेश राममानी याचं नाव असल्याने आश्चर्यं मानलं जातंय.
पाहा आयसीसीचा संपूर्ण संघ -
सूर्यकुमार यादव (C), यशस्वी जयस्वाल, फिल सॉल्ट, मार्क चेपमॅन, निकोलस पुरन (WK), रवी बिश्नोई, सिकंदर राजा, रिचर्ड नगावारा, मार्क अडियर, अल्पेश राममानी, अर्शदीप सिंग.