कोलकाता : ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी दणदणीत कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा फक्त १०६ रनवर ऑलआऊट झाला आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत. तर उमेश यादवला ३ आणि मोहम्मद शमीला २ विकेट मिळाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशकडून ओपनर शदमन इस्लामने सर्वाधिक २९ रन केले. लिटन दास २४ रनवर रिटायर्ड हर्ट झाला. नईम हसनला १९ रनची खेळी करता आली. बांगलादेशच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला खातंही उघडता आलं नाही. कर्णधार मोमीन उल हक, मोहम्मद मिथून आणि मुशफिकुर रहीम शून्य रनवर आऊट झाले. शेवटच्या क्रमांकावर खेळलेल्या अबू जायेदलाही खातं उघडता आलं नाही. 


भारत हा पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.