नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका टीम यांच्यात ३ टी-२० सामने खेळले जातील. नेहमीप्रमाणे यावेळी टीममध्ये तीन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 


तीन नवोदितांना संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बासिल थंपी, वॉशिग्टंन सुंदर आणि दीपक हुड्डा याचा समावेश आहे. तर जयदेव उनदकटची टीममध्ये वापसी झाली आहे. श्रीलंके विरूद्ध पहिला टी-२० सामना २० डिसेंबरला कटकमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना २२ डिसेंबरला इंदोरमध्ये आणि तिसरा सामना २४ डिसेंबरला मुंबईमध्ये होणार आहे.   


विराटला विश्रांती


टी-२० मधून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. त्याआधी वनडे टीममधूनही विराटला विश्रांती देण्यात आली आहे. तर दिनेश कार्तिकला टीममध्ये जागा देण्यात आलीये. 


नवोदित खेळाडूंचा अनुभव


यावेळी तीन खेळाडूंना टीममध्ये संधी देण्यात आली आहे. टी-२० मध्ये पहिल्यांदाच वॉशिंग्ट्न सुंदर, दीपक हुड्डा आणि बासिक थंपी यांना जागा देण्यात आली आहे. सुंदरने नुकतंच चांगलं प्रदर्शन केलं होतं. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरजाएंटमध्ये दमदार खेळ केला. 


दीपक हुड्डा -


हरियाणाचा दीपक हुड्डा अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. क्रिकेटच्या दुनियेत दीपक ‘हरीकेन’ नावाने लोकप्रिय आहे. ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने २ हजार २०८ रन्स केले आहेत. त्यामुळे टी-२० सामन्यांसाठी त्याच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.


वॉशिंग्टन सुंदर -


तामिळनाडूचा हा ऑफस्पिनर बॅट्समन बनण्यासाठी आला होता. अश्विनसारखाच तोही ऑफस्पिनर आहे. सुंदरचे वडील रणजी खेळले आहेत. तो अंडर १९ मध्ये टीम इंडियाचे नेतृत्वही करून चुकलाय. त्यानंतर त्याने गेल्यावेळी पुणेज सुपरजाएंटमध्ये आर.अश्विनला रिप्लेस केले होते. १२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सुंदरने ३० विकेट घेतल्या आहेत. 


बासिक थम्पी -


केरळच्या या गोलंदाजाने १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २८ विकेट घेतल्या आहेत. सोबतच टीम इंडियासाठी खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १५ विकेट आहेत. तेच आयपीएल १० मध्ये गुजरात लायन्ससाठी जर सर्वात चांगलं काही ठरलं असेल तर ती बासिलची गोलंदाजी.