`ही` असेल पहिली महिला पंच...
आता महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. खेळापासून ते अगदी टेक्नॉलॉजी पर्यंत सगळ्या क्षेत्रात त्या आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत.
मुंबई : आता महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. खेळापासून ते अगदी टेक्नॉलॉजी पर्यंत सगळ्या क्षेत्रात त्या आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत. पुरुषांप्रमाणे क्रिकेटमध्ये महिला संघाने देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. पण आता ऑन फिल्ड अंपायर म्हणून देखील महिला मैदानात दिसणार आहे. रविवारी न्यू दक्षिण वेल्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॅरी पोलोस्का पंच म्हणून मैदानात उतरणार आहेत.
क्रिकेटच्या मैदानात पंच म्हणून उतरणारी ती पहिली महिला असेल. या सामन्यातील कामगिरीपूर्वी कॅरी म्हणाल्या की, "मी एकदाही क्रिकेट खेळलेले नाही. मात्र क्रिकेट खेळाविषयी मला चांगली जाण आहे. पंच होण्यासाठीच्या पात्रता परीक्षेत अनेकदा अपयश आले. मात्र मी प्रयत्न सोडले नाहीत."
याशिवाय आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने महिलांच्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामन्यांसाठी चार महिला पंचाच्या नावाची घोषणा केली. कॅरी पोलोस्कासह न्यूझिलंडची अनुभवी खेळाडू कॅथलिन क्रॉस, इंग्लंडची रेडफर्ड आणि वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विलियम्स यांचा यात समावेश आहे.