मुंबई : आयपीएलची टीम बंगळूरु चॅलेंजर्सनी विराट कोहलीला १७ कोटी रुपयांची बोली लावली. यामूळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या ५ महागड्या खेळाडूंविषयी जाणून घेऊया..


युवराज सिंग 


युवराज सिंग आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. २०१५ साली दिल्ली डेअरडेविल्सने त्याला १६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. 


महेंद्रसिंग धोनी 


दोन वर्षांनी वापसी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीसाठी १५ कोटी रुपयांची बोली लावली. त्यामूळे आयपीएलच्या इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू माही ठरला.


४ जानेवारी २०१८ ला मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहसाठी बोली लावली. 


रोहित शर्मा 


रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सने १५ कोटी मोजले. त्यामूळे रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील चौथा महागडा खेळाडू ठरला. 


बेन स्टोक 


बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील पाचवा महागडा खेळाडू ठरला आहे. २०१७ मध्ये पुण्याच्या टीमने १४.५ कोटी रुपयांना खरेदी केले. 


तो आयपीएलमधील सर्वात जास्त किंमत घेणारा विदेशी खेळाडू ठरला.