One Love armband controversy: सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपची (FIFA World Cup 2022)  रंगतदार सुरूवात झाली आहे. यंदाचं यजमानपद हे कतारकडे असल्याने मोठा वाद देखील उद्भवलाय. कतारने अनेक निर्बंध लादल्याने (One Love armband controversy) अनेकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. निर्बंध असल्याने केवळ प्रेक्षकच नाही तर खेळाडू आणि त्यांचे संघही नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता हा वाद आणखीन पेटणार असल्याचं चित्र दिसत आहे. (fifa world cup 2022 what is one love armband lionel messi hurry kane all you need to know about the controversy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड यांसारख्या देशांसह सुमारे 10 देशांचे कॅप्टन फिफाच्या (FIFA World Cup 2022) एका निर्बंधावर तीव्र आक्षेप घेतला होता. तो निर्बंध म्हणजे...वन लव आर्मबँड घालण्यावर लावण्यात आलेली बंदी. मात्र, अनेक युरोपीय देशांनी यावर आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर 10 देशांच्या कर्णधारांनी (FIFA Teams) खेळादरम्यान वन लव्ह बँड घालण्याचा निर्णय देखील घेतला आहे.


वन लव आर्मबँड म्हणजे काय?


सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वन लव आर्मबँड म्हणजे खांद्यावर बांधायची पट्टी. जर्मनीचा कर्णधार आणि गोलकीपर मॅन्युएल न्यूअर (Manuel Neuer), इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन (Harry Kane) यांच्यासह अनेक देशांचे कर्णधारांनी वर्ल्ड कप सामन्यांमध्ये फिफाने अधिकृत 'आर्मबँड' खांद्यावर चढवत कतारच्या निर्देशांना किक (Kick) मारली आहे.


आणखी वाचा - Argentina Vs Saudi Arabia: लिंबू टिंबू साऊदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाला हरवलं! मेस्सीची एक चूक महागात


आम्ही दंड भरू पण वन लव आर्मबँड वापरू, असं जर्मनीचा कॅप्टन मँनुअल नुएरने म्हटलंय. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि सर्वांचा चाहता लिओनेल मेस्सी (Lionel Messi) देखील वन लव बँड घालून सौदी अरेबियाविरुद्ध खेळला. अनेक पत्रकारांनी देखील हा वन लव आर्मबँड हातावर चढवला.



दरम्यान, हॅरी केन आणि व्हर्जिल व्हॅन डायकसह युरोपियन संघांच्या सुमारे 7 कर्णधारांनी एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाशी एकता दर्शवण्यासाठी कतारमध्ये (Qatar) आर्मबँड घालण्याचा निर्णय घेतला. LGBTQ समुदायाविषयी जागृतता निर्माण करण्यासाठी घातलं जातं. त्यामुळे अनेक कॅप्टन्सने निर्बंध जुगारून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.