मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व टीम वर्ल्डकप जिंकण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया देखील सज्ज झाली आहे. पण भारतीय टीममध्ये चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवावे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. वर्ल्डकपसाठी चौथ्या क्रमांकावर केएल राहुलला खेळवले जाऊ शकते. असे मत माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये प्रतिकूल परिस्थितीत केएल राहूला खेळण्याची जाण आहे. तसेच त्याच्यात विदेशी खेळपट्टीवर खेळण्याचा उत्साह वाखण्याजोगा आहे. राहुल चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे वेंगसरकर म्हणाले. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहजपणे सेमीफायनलमध्ये पोहचेल असा विश्वास वेंगसरकरांना आहे. तर त्यानंतर टीम इंडियाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे देखील ते म्हणाले.


ओपनर जोडी


'आपल्याकडे शिखर धवन- रोहित शर्मा सारखी इन-फॉर्म ओपनर जोडी आहे. कॅप्टन कोहली तिसऱ्या (वनडाऊन) क्रमांकावर योग्य आहे'. असे वेंगसरकरांचे मत आहे. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. राहुलची खेळण्याची पद्धत उत्तम आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन हा पारंगत असायला हवा. असे देखील वेंगसरकर म्हणाले.


वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान सपाट खेळपट्ट्या असण्याची शक्यता आहे. परंतु राहुलच्या खेळण्याची पद्धत टीम इंडियासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वेंगसरकरांनी व्यक्त केला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने एकूण ५९३ धावा केल्या आहेत.  


अंतिम ११ मध्ये राहुल


केएल राहुल एक स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. टीम इंडियाने आपल्या विकेट लवकर गमावल्यानंतर राहुल टीमचा डाव सावरु शकतो. तेवढी क्षमता राहुलमध्ये आहे. निर्णायक क्षणी राहुल टीमसाठी सुरुवात (ओपनिंग) देखील करु शकतो. राहुलला प्लेइंग-११ मध्ये स्थान द्यायला हवे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.