मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विरोधात कटकारस्थान? माजी क्रिकेटरच्या वक्तव्याने खळबळ
Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने न्यूझीलंड विरुद्धवनडे आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज गमावली आहे. शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली
Indian Head Coach Gautam Gambhir : न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यावर आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावरच ताण वाढला आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने न्यूझीलंड विरुद्धवनडे आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज गमावली आहे. शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर, गौतम गंभीर (Gautam Gambhir) इत्यादी उपस्थित होते. यावेळी टीम इंडियाच्या आगामी ऑस्ट्रेलिया सिरीजचा रोडमॅप तयार करण्यात आला.
बीसीसीआयच्या या बैठकीनंतर लगेचच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की, जर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन करू शकली नाही तर बीसीसीआय टेस्ट आणि वनडे, टी 20 फॉरमॅटसाठी वेगवेगळे मुख्य प्रशिक्षक नेमले. असेही म्हंटलं जात होतं कि गौतम गंभीर ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टेस्ट फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाईल. तर गौतम गंभीर यांना टी 20 आणि वनडे फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवलं जाईल. या रिपोर्ट्सवर भारताचा माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर आकाश चोपड़ाने प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल
आकाशने घेतली गंभीरची बाजू :
आकाश चोपडाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं समर्थन केलं आहे. त्याने म्हंटले की गंभीर आणि कर्णधार रोहित या दोघांना लाजिरवाण्या पराभवाबाबत जबाबदार धरलं पाहिजे. पण मुख्य प्रशिक्षक पदावर फक्त तीन महिने राहिल्यावर बदल करणे हा निर्णय खूप घाईच ठरेल. आकाशने त्याच्या युट्युब चॅनलवर लिहिले की, 'मला वाटतं की ही अफवा आहे, ही बातमी मला निराधार वाटते की जर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करू शकली नाही तर मुख्य प्रशिक्षक बदलला जाईल. मला वाटतं हा निर्णय खूप घाईचा ठरेल. अशा अफवा दुष्ट हेतूने पसरवल्या जात आहेत. गंभीरला नुकतेच मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. खेळाडूंनी कामगिरी केली नाही तर प्रशिक्षकाला काढून टाकलं जातं, असं होत नाही. हा मार्ग नाही. अशा विचारसरणीशी मी अजिबात सहमत नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर