मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाकिस्तानच्या सैन्याचं आर्थिक पाठबळ वाढवण्यासाठी आपण गवतही खाण्यास तयार असल्याचं तो म्हणाला. 'अल्लाहनं मला संधी दिली तर मी  गवतही खाईन पण, सैन्याची आर्थिक परिस्थिती सुधारेन', असं तो ARY Newsला दिलेल्या  मुलाखतीत म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजी करत विरोधी संघातील खेळाडूला बेजार करणारा शोएब यावेळी त्याच्या वक्तव्यामुळं चर्चेत आला. देशातील नागरी संस्था सैन्याशी हातमिळवणी करत काम करत नसल्यामागचं कारणच आपल्याला उमगलं नसल्याचं मतगी त्यानं ठामपणे मांडलं. 


सैन्यदल प्रमुखांसोबत बसून त्यांना निर्णय घेण्यास सांगण्यासाठी आपण आग्रही असू. सैन्यासाठीची आर्थिक तरतूद २० टक्के असेल तर मी ती ६० टक्के करेन. जर असं करताना आम्ही दोघांनीही एकमेकांना अपमानित केलं तर यात‌ आमचंच नुकसान असेल, असं अख्तरने सांगितलं.



इतक्यावरच न थांबता देशासाठी आपण बंदुकीची गोळीही झेलायला तयार असल्याचं म्हणत कारगिलच्या युद्धात लढण्याची आपली इच्छा त्यानं बोलून दाखवली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या खेळाडूची ही मतं आणि तयाचे विचार अनेकांच्या भुवया उंचावत आहेत हे खरं.