Kirti Azad on Wrestlers Protest: 1983 च्या वर्ल्डकप संघाचे सदस्य असणारे माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) बृजभूषण सिंह यांना अटक न केल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1983 च्या वर्ल्डकप (1983 Cricket World Cup ) विजेत्या क्रिकेट संघाने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) वगळता कपिल देव (Kapil Dev), सुनील गावस्कर (Sunil Gavskar), दिलीप वेंगसरकर यासह सर्वांचा समावेश आहे. "मी पहिल्या दिवसापासून याविरोधात आवाज उठवत आहे. 28 मे रोजी खेळाडू आंदोलन करत असताना जेव्हा त्यांना निर्दयीपणे फरफटण्यात आलं तेव्हा आम्ही वर्ल्डकप विजेत्या संघाने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला," अशी माहिती किर्ती आझाद यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.


"महिला कुस्तीगिरांचं मनोबल इतकं खालावलं आहे की त्या गंगेत आपलं पदक फेकण्यास गेल्या होत्या. त्यावेळी आम्हाला हे पदक फक्त त्यांचं नाही तर देशाचा अभिमान असल्याचं वाटलं. ज्याप्रमाणे हे कुस्तीगीर देशाचा अभिमान आहेत. त्यांना तात्काळ न्याय दिला पाहिजे. कार न्याय उशिरा देणं हे न्याय नाकारणं आहे. 6 महिने झाले तरी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही," असं किर्ती आझाद म्हणाले आहेत.


किर्ती आझाद यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरला खट्टर यांनी मौन बाळगण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला आहे. साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं तेव्हा तिच्यासह सेल्फी काढताना मात्र ते अडखळले नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे. 


"1983 मध्ये पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींसाठी आम्ही वर्ल्डकप जिंकलो नव्हतो. जेव्हा लोक हे आंदोलन राजकीय आहे म्हणतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. जेव्हा साक्षी मलिकने 2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं तेव्हा ती नरेंद्र मोदी किंवा भाजपासाठी खेळत नव्हती. तिने ही कामगिरी भारतासाठी केली आहे," अशी आठवण किर्ती आझाद यांनी करुन दिली आहे. 


"नरेंद्र मोदी कधीही पदक आणि पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसह सेल्फी काढताना थबकले नाहीत. मनोहरलाल खट्टर यांनी साक्षीला हरियाणात बेटी बचाव, बेटी पढाओ साठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर केलं होतं. आता मात्र ते शांत आहेत. संपूर्ण प्रकारावर एक साधं ट्वीटही त्यांनी केलेलं नाही. ते आनंदाने फोटो घेत होते आणि आज त्यांच्यातील एकाला वाचवायचं असल्याने शांत आहेत," अशी टीका किर्ती आझाद यांनी केली आहे. 


142 प्रथम श्रेणी आणि सात कसोटी सामने खेळणाऱ्या आझाद यांनी ब्रृजभूषण सिंह यांना अटक न केल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारला आहे.  ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाच्या किमान 15 अधिकृत तक्रारीत दाखल झाल्या आहेत.


“कुस्तीपटूंनी कायद्याचं पालन केलं आहे. जानेवारीत ते सरकारकडे आले. देशाचा अभिमान असलेल्या मेरी कोमच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. त्यांना 30 दिवसांचा अवधी देण्यात आला असून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ते एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेले आणि तो दाखल झाला नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. यामधील एक आरोप अत्यंत भयंक आहेआहे, तो म्हणजे पॉक्सो. निर्भयावर घृणास्पद कृत्य घडल्यानंतर हा कायदा मंजूर करण्यात आला होता. याचा अर्थ तात्काळ अटक करा. पण मग अद्याप अटक का नाही? तो मोकळा का फिरतोय?", अशी विचारणा किर्ती आझाद यांनी केली आहे.