IPL 2022 : मेगा ऑक्शनमध्ये 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेला फाफ डु प्लेसिस आता आरसीबीच्या (RCB) जर्सीमध्ये दिसणार आहे. RCB Unbox नावाच्या ईवेंटच्या माध्यमातून आरसीबीने याची घोषणा केली. फाफ डुप्लेसी पहिल्यांदा आरसीबी (RCB) चा भाग बनला आहे. पण तो आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या 37 टी20 सामन्यांमध्ये त्याने नेतृत्व केलंय. ज्यापैकी 23 सामन्यांमध्ये त्याने विजय मिळवलाय. 13 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. हा शानदार रेकॉर्ड पाहता त्याच्याकडे RCB ने जबाबदारी सोपवली आहे.


RCB चा 5 वा कर्णधार


फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) आरसीबीच्या 5 वा कर्णधार बनला आहे. 2008 पासून अनेक दिग्गजांनी या संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. राहुल द्रविड (2008) ने आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये संघाचं नेतृत्व केलं. यानंतर अनिल कुंबळे (2009-10),  डेनियल विट्टोरी (2011-12) यांनी संघाचं नेतृत्व केलंय. त्यानंतर विराट कोहलीने 2013 ते 21 पर्यंत आरसीबीची जबाबदारी पार पाडली आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आतापर्यंत एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. या 14 वर्षात 7 वेळा प्लेऑफमध्ये जागा मिळवल्यानंतर आणि 3 वेळा फायनलमध्ये धडक दिल्यानंतर ही त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही.



2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीने फायनल सामना खेळला होता. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. आता आयपीएल 2022 मध्ये फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) त्याच्या नेतृत्वात हा 14 वर्षाचा वनवास संपवणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.