Alastair Cook Retires : इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक (Alastair Cook) याने सर्वांना चकित करणारा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ काऊंटी संघ असलेल्या एसेक्स सोबत करार करणार नसल्याचं सांगत त्याने शुक्रवारी क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. अॅलिस्टर कुकने आत्तापर्यंत 161 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 59 कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून काम केलंय. 2018 मध्ये अॅलेस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो काऊंटी क्रिकेट खेळत राहिला होता. अशातच आता त्याने क्रिकेटमधूनच निवृत्ती जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅलेस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12,472 कसोटी धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविडनंतर अॅलेस्टर कुकचा नंबर लागतो. कूकचा करार नुकत्याच पूर्ण झालेल्या देशांतर्गत हंगामाच्या शेवट त्याचा एसेक्स येथे संपला. दोन दशकांहून अधिक काळ, क्रिकेट माझ्या कामापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे, असं अॅलेस्टर कुक म्हणाला आहे.



माझ्या आयुष्याचा हा भाग संपण्याची हीच योग्य वेळ आहे. मी सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी माझ्याकडे जे काही आहे ते मी नेहमीच दिले आहे, परंतु आता मला नवीन पिढीला स्थान मिळवून द्यायचे आहे, असं अॅलेस्टर कुक म्हणतो.


आणखी वाचा - भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय


दरम्यान, कसोटी फॉरमॅटमध्ये दहा हजार धावा करणारा अॅलिस्टर कूक हा इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे. निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याचं वर्णन “खेळातील टायटन” असं केलं आहे. त्याचा वारसा केवळ त्याने साधलेल्या असंख्य धावा बनवण्याच्या विक्रमांमध्येच नाही, तर दीर्घ आणि प्रतिष्ठित कारकीर्दीत आहे, असं क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी रिचर्ड गोल्ड यांनी म्हटलं आहे.