नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेटर आणि माजी कर्णधार एलिस्टर कुकने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. टीम इंडिया विरुद्ध सुरु असलेल्या सिरीजमधला शेवटचा 5 वा सामना तो खेळणार आहे. यानंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिस्टर कुकने आतापर्यंत एकून 160 टेस्ट सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 12254 रन केले आहेत. इंग्लंडकडून टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत तो 6 व्या स्थानी आहे. टेस्टमध्ये कुकने 32 शतक केले आहेत.


कुकने 2006 मध्ये नागपूर टेस्टमध्ये भारताविरोधात टेस्ट करिअरला सुरुवात केली होती. या सामन्यामध्ये त्याने दमदार शतक ही ठोकलं होतं. 33 वर्षाच्या कुकने इंग्लंडकडून एकूण 92 वनडे सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 3204 रन केले. वनडेमध्ये त्याच्या नावावर 5 शतकं आहेत. 


कुकने म्हटलं की, 'मागील काही महिन्यांपासून खूप विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारता विरुद्ध सुरु असलेल्या सिरीजमध्ये शेवटचा सामना खेळणार आहे. ओव्हल टेस्ट माझ्या करिअरचा शेवटचा सामना असेल.'


कुकने म्हटलं की, 'हा एक दु:खी दिवस असेल. पण मी चेहऱ्यावर हास्य ठेवत हे सांगू शकतो कारण मला माहित आहे की, मी माझं सर्व काही दिलं आहे आणि आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. मी जे मिळवलं त्याचा कधी मी विचार देखील केला नव्हता. इतका काळ इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळणं अभिमानास्पद आहे.'