इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोणताही सराव सामना न खेळण्याच्या भारताच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतीय व्यवस्थापनाने बॉर्डर-गावसकर स्पर्धेसाठी डब्ल्यूएसीए येथे सामन्याचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, ते भारत अ संघासोबत एक इंट्रा-स्क्वॉड सामना खेळणार होते, पण तो नंतर रद्द करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020-21 मध्ये भारताने शेवटचा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने ॲडलेडमधील पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया A विरुद्ध सराव सामना खेळला होता आणि 2018-19 च्या दौऱ्यातही असंच केलं होते. विशेष म्हणजे, भारताने दोन्ही दौऱ्यांमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला होता. मात्र यावेळी त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या या निर्णयावर मायकल वॉनने नाराजी जाहीर केली आहे. जेव्हा खेळाडू एका देशांतर्गत घरच्या संघाविरुद्धच्या सराव सामन्याच्या तुलनेत इंट्रा-स्क्वॉड गेममध्ये भाग घेतात तेव्हा समान स्पर्धात्मक मानसिकता नसते असं तो म्हणाला आहे. 


"मला समजत नाहीये की, भारतासारख्या संघाची ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांच्याच खेळपट्टीवर स्पर्धा असताना फक्त इंट्रा-स्क्वाड सामना खेळण्याची इच्छा समजण्यापलीकडे आहे," असं त्याने म्हटलं आहे. पुढे तो म्हणाला की, "इंट्रा-स्क्वाड खेळातून येणाऱ्या परिणामांच्या आधारे तुम्ही स्पर्धात्मक मानसिकता कशी तयार करणार हे समजत नाही. आता वेळच सांगेल". 


भारताने सराव सामना खेळला असता तर फॉर्ममध्ये नसणाऱ्या विराट कोहली, रोहिक शर्मासारख्या खेळाडूंना फायदा झाला असता असं मत मायकल वॉनने व्यक्त केलं आहे. जर भारताने सराव सामना खेळला तर त्यांना पर्थमधील मैदानावरील बाऊन्सची सवय होईल असंही त्याने सांगितलं. "सध्याच्या भारतीय संघाला एकही सामना खेळण्याची इच्छा नाही याचं आश्चर्य वाटत आहे. WACA  ही अगदी योग्य खेळपट्टी आहे, तिथे त्यांना बाऊन्सची सवय होईल," असंही त्याने म्हटलं. 


त्याने सध्याचे खेळाडू आणि त्याच्या काळातील खेळाडू यांच्यातील मानसिकतेतील फरक स्पष्ट केला, ज्यांना परिस्थितीची सवय होण्यासाठी अधिक खेळांची आवश्यकता होती. "या खेळाडूंची आमच्याकडे असलेली मानसिकता वेगळ्या प्रकारची आहे, परंतु आम्हाला कदाचित आणखी खेळांची गरज आहे," असंही तो पुढे म्हणाला.


“ते वर्षाचे 12 महिने खेळत असतात आणि थेट त्यात प्रवेश करतात, परंतु जेव्हा ते मोठ्या फॉर्ममध्ये खेळत असतात तेव्हा दोन्ही खेळाडूंचे संच पहिल्या दिवशी कसे स्थिरावतात हे पाहणं मनोरंजक असेल. आधुनिक खेळाडूचा कदाचित असा विश्वास आहे की त्यांना गरज नाही (tour matches). त्यांना वाटतं की त्यांना वर्षभर पुरेसं क्रिकेट खेळायला मिळतं. संघाने फक्त सामने जिंकावेत," असंही त्याने सांगितलं.