`तू हे असं करु शकत नाहीस,` मैदानातील `त्या` कृतीवरुन माजी भारतीय क्रिकेटपटूने आर अश्विनला वाईट शब्दांत फटकारलं
R Ashwin DRS: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (Indian Cricketer R Ashwin) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (Tamil Nadu Premier League) खेळताना थर्ड अंपायरने DRS वर निर्णय दिल्यानंतरही आर अश्विनने पुन्हा एकदा DRS घ्यायला लावला. यानंतर त्याच्याविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
R Ashwin DRS: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (Indian Cricketer R Ashwin) सध्या क्रिकेट चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण म्हणजे तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (Tamil Nadu Premier League) खेळताना थर्ड अंपायरने DRS वर निर्णय दिल्यानंतरही आर अश्विनने पुन्हा एकदा DRS घ्यायला लावला. अश्विनने दुसऱ्यांदा DRS घेतल्यानंतरही निर्णय तोच आल्याने त्याचे प्रयत्न वाया गेले. मात्र सामन्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. सामन्यानंतर आऱ अश्विनने पुन्हा डीआरएस का घेतला याचं कारण सांगताना आपल्याला वाटलं की, अम्पायर दुसऱ्या अँगलने पाहतील असं म्हटलं. दरम्यान आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रा (former India cricketer Aakash Chopra) याने आता यावरुन आर अश्विनवर टीका केली असून हे सर्व आपल्या समजण्याच्या पलीकडे असल्याचं म्हटलं आहे.
या घटनेचं विश्लेषण करताना आकाश चोप्राने थर्ड अम्पायरची बाजू घेतली आणि सांगितलं की त्यांनी प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केलं. "अश्विन अन्नाच्या या छोट्या गोष्टीमुळे तामिळनाडू प्रीमियर लीग आता जगाच्या नकाशावर आलं आहे. तो फार चांगली गोलंदाजी करत होता. त्याने विकेटही घेतले. आणखी एका विकेटसाठी त्याने अपील केलं असता अम्पायरने आऊट दिलं," असं आकाश चोप्राने त्याच्या YouTube चॅनेलवर सांगितलं.
"अम्पायरने आऊट दिल्यानंतर अश्विन आणि सर्व खेळाडू आनंदित होते. पण फलंदाजाने रिव्ह्यू घेतला. थर्ड अम्पायरने चांगली कामगिरी केली. त्यांनी प्रोटोकॉलचं पालन करत सर्व अँगल तपासले. यावेळी बॅट जमिनीवर आदळली होती आणि तिचा चेंडूशी काही संपर्क झाला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि फलंदाज बाद नसल्याचं स्पष्ट केलं," असं त्याने पुढे सांगितलं.
दरम्यान, आर अश्विनने निर्णयालाच आव्हान दिलं. त्याने पुन्हा एकदा निर्णय तपासण्यास सांगितलं. यावर आकाश चोप्राने म्हटलं की, जर लीगमधील अधिकाऱ्यांनी नियमपुस्तिका पाहिली तर पुन्हा डीआरएस घेण्याचा पर्यायच नाही हे त्यांना समजेल असं म्हटलं.
"अश्विनने आपल्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू घ्यायचा आहे असं सांगितलं. त्याने रिव्ह्यूचा रिव्ह्यू मागितला आणि ते झालंदेखील. हे समजण्यापलीकडे आहे. जेव्हा लीगचे अधिकारी पाहतील तेव्हा असा काही पर्यायच नाही असं ते म्हणतील," असं आकाश चोप्राने म्हटलं.
"तुम्ही हे असं काही करु शकत नाही. यासाठी अनेक कारणं आहेत. तुम्हाला 15 सेकंदात रिव्ह्यू घ्यायचा असतो. रिव्ह्यू घेतल्यानंतर अम्पायरने सर्व प्रोटोकॉलचं पालन करत त्यांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही थर्ड अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देतात त्यांच्याच निर्णयाला पुन्हा तपासायला सांगत आहात", अशी टीका आकाश चोप्राने केली आहे.