भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भवितव्याबाबत चर्चा रंगली असून, शंका व्यक्त होत आहेत. रोहित आणि विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी रोहित शर्मा आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये संघाचं नेतृत्व करेल असं स्पष्ट केलं आहे. मात्र रोहित आणि विराट 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी उपलब्ध असतील की नाही याबाबत साशंकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेदरम्यान गौतम गंभीरने आपल्या योजनेत रोहित आणि विराट यांना स्थान असून दोघांमध्ये अद्याप बरंच क्रिकेट शिल्लक असल्याच म्हटलं आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू के श्रीकांत यांनी गौतम गंभीरच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली आहे. ज्यामध्ये त्याने जर वरिष्ठ खेळाडू टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले तर त्यांना संघात स्थान नसेल असं म्हटलं होतं. 


"गौतम गंभीरने यू-टर्न घेतला आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी तो म्हणत होता की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कामगिरी केली नाही तर ते माझ्या संघात बसणार नाहीत. मात्र आता त्याने यू-टर्न घेतला असून विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू नाहीत असं म्हणत आहेत. मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याने सांगितलं की, दोघांकडे खूप क्रिकेट शिल्लक आहे आणि आशा आहे की ते 2027 च्या विश्वचषकासाठी ते फिट असतील,” Dmx श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दोघांच्या सहभागाबद्दल, श्रीकांत म्हणाले की, विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो सहभागी होण्याची शक्यता आहे. पण रोहितला 40 वर्षांच्या पुढे खेळणं कठीण होईल.


"तो एक चांगला खेळाडू आहे, पण सध्या त्याचं वय 37 आहे, आणि पुढील एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून तीन वर्षे पुढे आहे. तेव्हा तो 40 वर्षांचा असेल. म्हणजे, जोपर्यंत तुम्ही धोनी किंवा सचिनसारखे सुपर-फिट नसाल तर वयाच्या 40 व्या वर्षी खेळू शकत नाही. माझ्या मते विराट कोहली 2027 चा वर्ल्डकप नक्की खेळेल. पण रोहितच्या बाबतीत अती केल्यास तो दक्षिण आफ्रिकेत बेशुद्ध पडेल," असंही ते पुढे म्हणाले. 


2027 एकदिवसीय विश्वचषक आफ्रिकेत आयोजित केला जाईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.