MS Dhoni Police: लष्करानंतर महेंद्रसिंग धोनीची पोलीस खात्यातही अधिकारी पदावर नियुक्ती? खाकी वर्दीतील फोटो व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नव्या लूकमधील एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत महेंद्रसिंग धोनी पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत आहे. धोनी लष्करात लेफ्टनंट कर्नल आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये एका कार्यक्रमात धोनीला हे पद सोपवण्यात आलं होतं.
MS Dhoni Police: भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला आहे. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात (MS Dhoni in Police Look) दिसत आहे. धोनीचा हा फोटो पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत.
धोनीचा हा फोटो पाहून लष्करानंतर (Indian Army) त्याला पोलीस खात्यातही अधिकारी पद देण्यात आलं आहे का अशी चर्चा रंगली आहे. पण तसं काही नसून धोनी खरोखर पोलीस अधिकारी झालेला नाही. किंवा त्याने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलेलं नाही. हा फोटो धोनीच्या नव्या जाहिरातीमधील आहे.
क्रिकेटनंतर धोनी जाहिरातींच्या माध्यमातून वेगवेगळ्या लूकमध्ये आपल्या चाहत्यांना भेटत असतो. धोनीचा हा फोटोही जाहिरातीमधील आहेत.
धोनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते धोनीच्या फोटोवर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
धोनी भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर
महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये एका कार्यक्रमात धोनीकडे हे पद सोपवण्यात आलं होतं. लष्करात सहभागी झाल्यानंतर धोनीला त्या सर्व सुविधा मिळत आहेत, ज्या एका लष्कर जवानाला दिल्या जातात.
धोनीने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप जिंकून दिला होता. याचा सन्मान म्हणून धोनीला हे पद देण्यात आलं आहे.
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. सध्या धोनी फक्त इंडियन प्रिमियर लीगमध्ये (Indian Premiere League) खेळताना दिसत आहे. धोनीकडे चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद आहे. 2023 च्या हंगामातही धोनी खेळताना दिसणार आहे.