Dhoni Drives Tractor in Farm: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) तब्बल दोन वर्षांनी Instagram वर पुनरागमन केलं आहे. धोनीने Instagram वर एक व्हिडीओ शेअर केला असून काही तासातच या व्हिडीओला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत धोनी रांचीमधील (Ranchi) आपल्या फार्महाऊसमधील (Farmhouse) शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीची पोस्ट पाहून त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते धोनी Instagram वर पुन्हा कधी सक्रीय होणार याची वाट पाहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की "काहीतरी नवी न शिकणं चांगला अनुभव होता. पण काम संपवण्यासाठी फार वेळ लागला". 


व्हिडीओमध्ये धोनी शेतात ट्रॅक्टर (Dhoni Drives Tractor) चालवत आपण नवीन गोष्ट शिकल्याचं चाहत्यांना दाखवत आहे. काही वेळाने त्याच्या शेजारी ट्रॅक्टरमध्ये एक व्यक्ती बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी धोनी काम संपवत असल्याचं दिसतं. 



महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीने अनेक रेकॉर्ड केली. टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला होता. निवृत्तीनंतर धोनी आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. दरम्यान धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही.