`तुम्ही काय डोळे बंद करुन....`, सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, `तुम्हाला कोणी..`
Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना सुनावलं आहे. सामन्यादरम्यान बाऊंड्री लाईनवर रिफ्रेशमेंट घेण्याच्या जलदगती गोलंदाजांच्या नव्या पद्दतीवर सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. सामन्यादरम्यान आधीच ब्रेकदरम्यान ड्रिंक्स घेतले असताना पुन्हा सीमेवर क्षेत्ररक्षण करताना रिफ्रेशमेंट घेण्याची गरज काय? अशी विचारणात सुनील गावसकर यांनी केली आहे. Sportstar वरील आपल्या स्तंभलेखात त्यांनी यामुळे गोलंदाजांनी अतिरिक्त फायदा मिळत आहे, जो फलंदाजांनी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. गावस्कर यांनी आधुनिक क्रिकेटमधील प्रशासनावर या घडामोडींकडे डोळेझाक केल्याबद्दल आणि आजकाल ही सामान्य गोष्ट केल्याबद्दल टीका केली आहे.
"क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून आणि खासकरुन जलगदती गोलंदाजांकडून एक गोष्ट केली जात आहे. आपल्या ओव्हर्स टाकल्यानंतर ते जेव्हा सीमेवर क्षेत्ररक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना रिफ्रेशमेंट ड्रिंक मिळतात. याकडे प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे," असं गावसकर यांनी लिहिलं आहे.
आयसीसी नियमानुसार, जर सामन्यात वेळ वाया जात नसेल आणि इतर कोणत्याही क्रिकेटपटूला त्रास होत नसल्यास नियोजित ड्रिंक्स ब्रेकच्या बाहेरही खेळाडूंना ड्रिंक्स घेण्याची परवानगी आहे. “एखाद्या खेळाडूला एकतर सीमेवर किंवा विकेट पडल्यावर, मैदानावर ड्रिंक दिलं जाऊ शकतं. यावेळी खेळण्याचा वेळ वाया जाता कामा नये. पंचांच्या परवानगीशिवाय इतर कोणतेही ड्रिंक मैदानात नेण्याची परवानगी देऊ नये. मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाणाऱ्या कोणत्याही खेळाडूने क्रिकेटचे कपडे परिधान केलेले हवेत,” असं गावसकर म्हणाले आहेत.
पण या नियमाचा फक्त गोलंदाजांना फायदा होत असल्याकडे सुनील गावसकर यांनी लक्ष वेधलं. “जर फक्त सहा चेंडू टाकल्यानंतर तुमचा गोलंदाज हायड्रेट होणार असेल तर मग ड्रिंक्स ब्रेक घेण्यात अर्थ काय? लक्षात ठेवा, फलंदाजाला ही संधी मिळत नाही. एका ओव्हरमध्ये त्याने कदाचित 8 धावा काढल्या असल्या तरी त्याला ड्रिंक करण्याची संधी मिळत नाही,” अशी टीका गावसकरांनी केली आहे.
“क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये स्टॅमिना आणि धीर धरायला हरकत नाही मग फॉरमॅट कुठलाही असो, अगदी स्पष्टपणे सांगायचे तर तो त्या दिवसांकडे परत जायला हवा जेव्हा खेळाच्या प्रत्येक तासानंतर आणि त्याआधी फक्त विरोधी कर्णधार आणि अम्पायर्सच्या परवानगीनेच ड्रिंक्स घेतले जायचे,” असंही त्यांनी सांगितलं.