श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shamra) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी विश्रांती घेतली आहे. भारतीय संघ आता 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरोधात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याआधी 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी सुरु होत आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह वगळता अनेक वरिष्ठ खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा, विराट कोहली दुलीप ट्रॉफी खेळणार नसल्याने माजी क्रिकेटर सुरेश रैनाने यावर विधान केलं आहे. रैनाच्या मते दोघांनीही दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती. रैनाच्या सांगण्यानुसार, भारतीय संघाने बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेलं नाही. अशात खेळाडूंना कसोटीचा सराव असायला हवा. भारताला आगामी काळात बांगालदेशव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधातही कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यान सुरेश रैनाने यावेळी कुटुंबासह वेळ घालवणंही तितकंच महत्वाचं असल्याचं मान्य केलं. 


सुरेश रैनाने स्पोर्ट्स तकला सांगितलं की, "त्यांना खेळायला हवं होतं. कारण आयपीएलनंतर आपण रेड बॉल क्रिकेट खेळलेलो नाही. जर तुम्ही घरगुती सत्रात व्यग्र असाल तर लाल चेंडूने अभ्यास करण्याचीही गरज असते. ते फार परिपक्व असून खेळाडू या नात्याने काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे. अनेकदा कुटुंबासह वेळ घालवणंही महत्वाचं असतं".


बीसीसीआयने जेव्हा खेळाडू राष्ट्रीय संघाचा भाग नसतील तेव्हा घरगुती क्रिकेट खेळावं लागेल असं स्पष्ट केलं होतं. पण या नियमातून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना सूट देण्यात आली आहे. खेळायचं की नाही हे पूर्णपणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. 


कसोटी खेळाडूंनी बांगलादेश आणि न्यूझीलंडविरोधातील मालिकेआधी किमान दुलीप ट्रॉफीर खेळावं अशी बोर्डाची इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीत टीम-ए संघाचं नेतृत्व शुभमन गिल. टीम-बी अभिमन्यू ईश्वरन आणि टीम-सीचं ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. 5 सप्टेंबरपासून दुलीप  ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे. 


कसे आहेत संघ?


भारत ए: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत. 


भारत बी: अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नीतीश कुमार रेड्डी*, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (विकेटकिपर)


भारत सी: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, ऋतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वॉरियर. 


भारत डी: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (डब्ल्यूके),सौरभ कुमार.