T20 World Cup: आयपीएल (IPL) स्पर्धा संपताच टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. जून महिन्यात वर्ल्डकप सुरु होणार असल्याने निवड समितीकडे संघ निवडण्यासाठी आता फार कमी वेळ आहे. संघ निवडण्यासाठी निवड समितीला आयपीएलची मदत होणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर काही खेळाडू टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवू शकतात. दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांना संघात स्थान द्यावं का यासंदर्भात चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करु शकला नसल्याने त्याला बाहेरच ठेवलं जाऊ शकतं. पण यादरम्यान अनेक माजी खेळाडू आपलं मत मांडत असून संघ कसा असावा हे सांगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही भारतीय टी-20 संघ कसा असावा याबाबत मत मांडलं आहे. त्याने आपला 15 सदस्यीय संघ निवडला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्याने या संघात के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) यांना स्थान दिलेलं नाही. 


इरफान पठाणने आघाडीच्या फलंदाजांसाठी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांची निवड केली आहे. या तिघांपैकी दोघांना ओपनिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. तसंच राखीव खेळाडूंसाठी शुभमन गिलदेखील पर्याय आहे. इरफानने दोन ओपनिंग स्पॉट्ससाठी चार खेळाडू निवडले असून कोहली आणि गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास सक्षम आहेत.



मधल्या फळीसाठी इरफान पठाणने सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांची निवड केली आहे. यामध्ये त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्यालाही स्थान दिलं आहे. शिवम दुबेही गोलंदाजी करतो, पण अद्याप चेन्नईने त्याला गोलंदाजीची संधी दिलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे संघात संजू सॅमसनला स्थान देण्यात आलं असून विकेटकिपर म्हणून फक्त ऋषभ पंतला निवडलं आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर यांना वगळण्यात आलं आहे. 


अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजाला स्थान दिलं असून फिरकी गोलंदाजीसाठी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनाही निवडलं आहे. रवी बिष्णोई आणि वरुण चक्रवर्ती यांना मात्र वगळण्यात आलं आहे. 


जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना निवडलं आहे. टी नटराजन, मयांक यादव, खलील अहमद यांना वगळण्यात आलं आहे. 


कसा आहे इरफान पठाणचा T20 विश्वचषक भारतीय संघ: 


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.