T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो `ही` टीम वर्ल्ड कप जिंकणार!
T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!
T20 World Cup : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup ला सुरूवात होईल, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Ind VS Pak) विरुद्ध असेल. आशिया कपमधील पराभवानंतर आता भारतीय संघ मैदानात कसून तयारी करताना दिसत आहे. अशातच आता भारताचा माजी विकेटकीपर सबा करीमने (Saba Karim) केलेल्या भविष्यवाणीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Former Indian Wicketkeeper Saba Karim's Biggest Prediction on T20 World Cup)
काय म्हणाला सबा करीम?
T20 World Cup हा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर स्पिनर्स जास्त प्रभावकारक ठरू शकत नाहीत. त्याचबरोबर मोठं मैदान असल्याने टीममध्ये पावर हिटर्सची देखील गरज असते. त्यामुळे यावेळी घरच्या मैदानावर खेळणारी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार आहे, असं सबा करीम म्हणाला आहे.
मला वाटतं की ऑस्ट्रेलिया (Team Australia) एक मजबूत संघ आहे. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे सर्वोत्तम बॉटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये महत्त्वाचं योगदान देऊ शकतात, असं करीम म्हणाला आहे.
मोठ्या मैदानावर टीममध्ये पावर हिटर्सची गरज असते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ अशा खेळाडूंना बाजूला काढून ठेवतो. त्यांच्या टीममधील टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड कोणत्या क्षणी सामना पलटवण्याची हिंमत ठेवतात, असंही करीम यावेळी म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघात देखील सुर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या यांसारखे मोठे हिटर्स आहेत. मात्र, भारतीय संघाला गोलंदाजीच्या क्रमवारीत मोठा बदल करण्याची गरज आहे.