मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचं (Rajesh Verma Death) निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 40 वर्षी राजेशने जगाचा निरोप घेतला आहे. राजेशचे माजी सहकारी भाविन ठक्कर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजेश यांच्या मृत्युमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. (former mumbai ranji trophy winning cricketer rajesh verma passed away at age 40)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश मध्यमगती गोलंदाज होता. राजेशने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 7 प्रथम श्रेणी सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं. 


राजेशने अखेरचा सामना 2008 मध्ये पंजाब विरुद्ध खेळला होता. राजेश 2007 मध्ये मुंबई टीमचा भाग होता. तेव्हा टीममध्ये सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि रोहित शर्मा होते. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये राजेशचा समावेश नव्हता.


राजेशने 7 सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये एकदा 5 विकेट्सही घेतल्या होत्या. राजेशची 97 धावा देत 5 विकेट्स ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. 


राजेशने 11 लिस्ट ए सामन्यात 20 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्त दाखवला होता. राजेशने आपल्या क्रिकेटची सुरुवात ही टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या इएलएफ अकादमीतून केली होती.


यॉर्करचा बादशाह


राजेशचा सहकारी भाविन ठक्करने त्याच्या आठवणींना उजाळा दिला. "राजेश या जगात नाही, यावर माझा विश्वास बसत नाही.  आम्ही दोघांनी अंडर 19 क्रिकेटची सुरुवात एकत्र केली होती. आम्ही दोघे वडाळ्यावरुन एकत्र प्रवास करायचो", असं म्हणत भाविनने राजेशसोबतच्या आठवणी सांगितल्या 


"राजेश आणि मी  20 दिवसांपूर्वी बीपीसीएल दौऱ्यावर होतो. मी त्या दिवशी राजेशसोबत जवळपास 30 मिनिटं गप्पा मारल्या. मात्र आज सकाळी 4 वाजता समजलं की राजेश या जगात राहिला नाही. तो माझ्या जवळचा मित्र होता. तो हरहुन्नरी गोलंदाज होता. त्याच्या यॉर्कर बॉलचा सामना करणं फार अवघड होतं", असंही भाविनने म्हणाला.


दरम्यान 20 एप्रिलला बांगलादेशचा माजी क्रिकेटर मुशर्रफ हुसेनचं (Mosharraf Hossain) निधन झालं होतं. दुर्देवी बाब अशी की मुशर्रफचंही वयाच्या 40 वर्षीच निधन झालं होतं. त्याला मेंदूचा कर्करोग झाला होता.