`12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...`, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, `इडिया काय अंजिक्य...`
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारतामध्ये कसोटी मालिका जिंकत मोठा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघाचा (Indian Cricket Team) पराभव करत भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. न्यूझीलंडचा भारतातील हा पहिला कसोटी विजय ठरला आहे. यासह भारताचा सलग 18 मालिका जिंकण्याचा विजयरथही रोखला. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांनी भारताचा दौरा करत आपल्या पराभवाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न केला. अखेर यामध्ये न्यूझीलंड संघाला यश आलं.
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) यावेळी क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे. "हो, मला वाटतं आपण फक्त इतिहास पाहतो. ते काय 12 वर्षांपासून कोणी करु शकलं किंवा 18 मालिका किंवा मग काहीही असो. हे फार आव्हानात्मक आहे. जर तुम्ही माझ्या नजरेतून पाहिलं तर मी जितकं क्रिकेट खेळलो आहे ते पाहता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक आहे. दोन्ही ठिकाणी असणारी स्थिती, विरोधकांचा दर्जा आणि घरात किती चांगले खेळतात हे पाहता फारच आव्हान असतं," असं तो म्हणाला.
साऊथीने भारताचा विजयरथ रोखणाऱ्या संघाचा भाग असल्याचा आनंद व्यक्त केला. तसंच ते घरच्या मैदानावर अजिंक्य नाहीत हे दाखवून दिल्याचं म्हटलं. "फक्त जर तुम्ही 12 वर्षं, 18 मालिका या एका गोष्टीकडे पाहिलं तर भारताचा विजयरथ रोखणाऱ्या संघाचा भाग असल्याचा आनंद आहे. आम्ही जगाला दाखवून दिलं की, भारतीय संघाचा भारतातच पराभव करणं शक्य आहे," असं कौतुक त्याने केलं.
'सचिन, द्रविड, लक्ष्मणसह खेळणं स्वप्नवत होतं'
आपल्या पहिल्या दौऱ्यावर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना सामोरं गेल्याची आठवण सांगताना त्याने भारतात प्रवास करणं नेहमीच कठीण का आहे, याकडे लक्ष वेधलं.
"मला वाटतं पहिली गोष्टी जी डोक्यात येते ती म्हणजे आव्हानात्मक आहे. आम्ही न्यूझीलंडमधून येऊन इथे खेळतो तेव्हा सगळं नवीन असतं. तुम्ही जेव्हा कधी इथे येता तेव्हा सुपरस्टार संघाविरोधात खेळत असता. जर तुम्ही 2010 मधील संघाकडे पाहिलं तर तेव्हा संघात तेंडुलकर, सेहवाग, गंभीर, द्रविड, लक्ष्मण, धोनी होते. एक तरुण खेळाडू म्हणून या सर्वांविरोधात खेळणं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं".